घरमहाराष्ट्रअलिबागमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ९ जणांना अटक

अलिबागमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ९ जणांना अटक

Subscribe

हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटमधील सर्व आरोपींसह देहव्यापारासाठी आलेल्या ७ मुलींना अलिबाग न्यायालयासमोर हजर केल्यानंतर या मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

एका हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी रात्री पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ५ महिलांसह ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ७ मुलींची रवानगी कर्जतच्या सुधारगृहात करण्यात आली आहे. यामध्ये सिनेक्षेत्रात काम करणार्‍या मुली असल्याची माहिती मिळाली आहे.

असा केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महत्वाचे म्हणजे आरोपींकडे २६ ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. अलिबागच्या किनारपट्टी भागातील बंगले भाड्याने घेऊन अशा प्रकारे देहविक्रीचा व्यवसाय आणि अंमली पदार्थांचा व्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनीच मोठ्या खुबीने हा व्यवसाय करणार्‍या राखी नोटानी व रंजिता सिंग उर्फ रेणु यांचे मोबाईल नंबर मिळवले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. त्यानंतर या दोघींनी त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलींची नावे कळवून सौदा निश्चित केला. त्याप्रमाणे गुरुवारी रात्रीसाठी दोन बंगले ऑनलाईन बुक करण्यात आले. तेथे अशा पार्टीचे आयोजन करण्यात आले. तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडे पैसेही देण्यात आले. या गिर्‍हाईकाच्या माध्यमातून रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

- Advertisement -

या आरोपींना केली अटक

महिला पोलिसांनी राखी नोटानी आणि रंजिता सिंग यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २६ ग्रॅम कोकेन आढळून आले. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक, सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

देहविक्रीसाठी आणललेल्या ७ मुलींची सुटका

शुक्रवारी या सर्व आरोपींसह देहव्यापारासाठी आलेल्या ७ मुलींना अलिबाग न्यायालयासमोर हजर केल्यानंतर या मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख, सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, पोलीस उपनिरीक्षक बुरुंगळे आणि २५ पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -