घरमहाराष्ट्रनाशिकरेल्वे मजदूर-ऑल इंडिया महायुतीचा ऐतिहासिक विजय

रेल्वे मजदूर-ऑल इंडिया महायुतीचा ऐतिहासिक विजय

Subscribe

मध्य रेल्वे व कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे ईसीसी सोसायटीच्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व ऑल इंडिया एससी, एसटी महायुतीने झंझावाती विजयी मिळवला

मध्य रेल्वे व कोकण रेल्वे सेंट्रल रेल्वे ईसीसी सोसायटीच्या निवडणुका २६ जूनला मुंबईसह इगतपुरी रेल्वे पी. डब्लु. आय. कार्यालय व रेल्वे स्थानक येथील शासकीय कार्यालयात मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल २७ जूनला लागला. यात नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व ऑल इंडिया एससी, एसटी असोसिएशन महायुतीचे एकुण ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळी सेंट्रल रेल्वे मजदुर संघ, रेल कामगार सेना यांचे कडवे आव्हान स्विकारत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन व ऑल इंडिया एससी, एसटी महायुतीने झंझावाती विजयी मिळवला आणि ८० उमेदवार निवडून ऐतिहासिक विजयाची सलामी दिली.

इगतपुरी रेल्वे विभागात सहा उमेदवार रिंगणात होते. सिनिअर सेक्शन इंजिनियर तथा एन. आर. एम. यु अध्यक्ष कॉ. बी. के. केदारे, टी. एन. सी तथा सहसचिव नवीन आव्हाड यांना एकुण मते ७५९ पैकी ४५० मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. १५ वर्षापासून सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन व ऑल इंडिया एससी, एसटी असोसिएशनला अपयश सहन करावे लागत होते. मात्र, कामगार एकजुटीने निर्णायक बदल घडवून अखेर सत्ता काबीज केली. बहुमत मिळवून विजयी पताका उंचावत विजेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. निवडणूक जिंकण्याकरता एन.आर. एम. यू तथा मध्य रेल्वे, कोकण रेल्वे विभाग महामंत्री वेणु. पी. नायर, ऑल इंडिया एससी, एसटी महायुतीचे अध्यक्ष गौरव विधाते यांचे मार्गदर्शन लाभले. बी. के. केदारे, सहसचिव नवीन आव्हाड, सचिव संजय दोंदे, सहायक महामंत्री अहमद खान, कार्यध्यक्ष अरूण मनोरे, महामंत्री आर. के. मलबारी, पालकमंत्री सुभाष पाटील, स्टेशन प्रबंधक प्रेमचंद आर्या, रामानंद यादव, आनंद शिंदे, उपाध्यक्ष रविंद्र गायकवाड, मोहन नेटावटे, हमीद खान, अहमद शेख, संतोष दुगी, सदाशिव क्षीरसागर, गुलाम रसुल, संजय परदेशी, पुजा सपकाळे, मनोज खंडापुरे, अनंत नेटावटे सह पदाधिकारी व रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -