घरमहाराष्ट्रपेट्रोल-डिझेलनंतर विमाही महागला

पेट्रोल-डिझेलनंतर विमाही महागला

Subscribe

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चालले आहे आणि आता त्यात गाड्यांचा विमाही महागल्यांने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच असून हे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच पुन्हा एकदा एक नवीन भर पडली आहे. ती म्हणजे गाडी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना गाडीच्या किंमतीच्या तुलनेत १० टक्के जास्तीचा वीमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आता गाडी घ्याची की नाही हा प्रश्न वाहनधारकांना सतावत आहेत.

का मोजावे लागणार जास्तीचे पैसे

कोर्टाच्या निर्णयानुसार थर्ड पार्टी इन्शूरन्स विमा बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गाडी चालकांसाठी १५ लाखांचा वैयक्तिक अपघात विमा हा सुद्धा बंधनकारक करण्यात आला आहे. कोर्टाच्या या दोन निर्णयामुळे वाहनधारकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एखाद्या वाहनधारकांनी दुचाकी गाडी खरेदी करणे बंधनकारक असून त्याला वैयक्तिक अपघात विमा सुद्धा घेणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

कार खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

कार खरेदी केल्यास थर्ड पार्टीला इन्शूरन्स घेणे बंधनकारक आहे. तसेच वैयक्तिक अपघात विम्यासाठी ७५० रुपये जास्तीचे खर्च करावे लागणार असून कार खरेदी करणाऱ्यांना २० हजारापर्यंत रक्कम खर्च करावा लागतो. या आधी सप्टेंबर महिन्या अगोदर कार खरेदी केल्यानंतर १० हजार रुपये खर्च यायचा मात्र आता तो दुप्पट होत आहे. आता हा खर्च २० हजारापर्यंत गेला आहे.

दुचाकी खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

या दोन कारणांमुळे दुचाकीच्या इन्शूरन्स प्रीमियरसाठी १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ७५ हजार रुपयांच्या मोटारसायकल खरेदीवर ७ हजार ६०० रुपयांचा इन्शूरन्स भरावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -