घरक्रीडाविंडीजविरुद्धच्या वनडे संघात रिषभ पंतची निवड

विंडीजविरुद्धच्या वनडे संघात रिषभ पंतची निवड

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या २ वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या २ वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. तर आशिया चषकात विश्रांती मिळालेला कर्णधार विराट कोहलीही संघात परतला आहे. रिषभ पंतने कसोटी सामन्यांत केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याची वनडे संघात निवड झाली आहे.

धोनीच्या संथ फलंदाजीमुळे पंतला संधी 

महेंद्रसिंग धोनीला मागील काही काळात वनडे सामन्यांत चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्याने नुकत्याच झालेल्या आशिया चषकात अगदी संथपणे फलंदाजी केली होती. त्यामुळेच निवड समितीने रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतने भारत ‘अ’ आणि आयपीएलमध्ये केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याची भारतीय वनडे संघात निवड झाली आहे.

बुमराह-भुवनेश्वरला विश्रांती 

पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी निवड समितीने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोहम्मद शमीचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तो आशिया चषकात चांगले प्रदर्शन करणाऱ्या युवा खलील अहमद आणि शार्दूल ठाकूर यांच्यासोबत वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळले. तर हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुले आशिया चषकात संधी मिळालेल्या रविंद्र जडेजानेही आपले संघातील स्थान कायम ठेवले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -