घरमहाराष्ट्र'संविधानाला बदलून हिंदू राष्ट्राची स्थापना करु'; हिंदू विधिज्ञ परिषदेचा इशारा

‘संविधानाला बदलून हिंदू राष्ट्राची स्थापना करु’; हिंदू विधिज्ञ परिषदेचा इशारा

Subscribe

'संविधानाला बदलून हिंदू राष्ट्राची स्थापना करु', असा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेने दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू विधिज्ञ परिषद आक्रमक झाली आहे.

राम मंदिराप्रकरणी हिंदू विधिज्ञ परिषद आक्रमक झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राम मंदिरासंबंधीत याचिकेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने अजूनही सुनावणी केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावर लवकर सुनावणी दिली नाही, तर संविधानाला बदलून आम्ही हिंदू राष्ट्राची स्थापना करु, असा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिला आहे. ३ फेब्रुवारीला कल्याणच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले इचलकरंजीकर?

वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले की, ओरिसा येथील जन्ननाथ मंदिराचे व्यवस्थापन नीट नाही म्हणून सर्वोच्च न्यायालय चिंता व्यक्त करते, त्याची सुनावणी ऐकते. उज्जैनच्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर कोणत्या पाण्याने अभिषेक करावा, याचे निवाडे सर्वोच्च न्यायालय करते. लोक दारू पीत असतांना बारबालांनी त्यांच्यापुढे नाचावे की नाही, समलैंगिक संबंध ठेवावेत की नाही, हे ऐकायला सर्वोच्च न्यायालयाला वेळ आहे; परंतु न्यायालयाला गेली ८ वर्षे श्रीराम मंदिराची याचिका ऐकायला वेळ नाही, हे आमचे दुर्दैव आहे. यापुढे ते म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे, असे आपण म्हणतो. या संविधानात बदल व्हायला नको होते; मात्र संविधानात आतापर्यंत १०३ सुधारणा झाल्या आहेत. संविधानात ‘सेक्युलर’ हा शब्द डॉ. आंबेडकरांनी घातला नव्हता, तो इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात का घातला?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘जर त्यांनी केलेले बदल तुम्हाला चालत असतील, तर संविधानात आणखी एक बदल करून आम्ही हिंदु राष्ट्राची स्थापना करू’, असे वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -