घरमहाराष्ट्रविठ्ठलभक्तीची उर्मी अचानक कशी आली; केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला

विठ्ठलभक्तीची उर्मी अचानक कशी आली; केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी आक्रमकपणे पावले टाकत असलेले भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज दोन दिवसांसाठी सोलापूर दौऱ्यासाठी आज ते उमरगा येथे दाखल झाले. या दौऱ्याच्यानिमित्ताने KCR यांच्याकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जात आहे.  महाराष्ट्रात 600 गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले, त्यामुळे सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. के. चंद्रशेखर राव उद्या सकाळी पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. विठ्ठलभक्तीची उर्मी अचानक कशी आली, असे ते म्हणाले. (How Vitthalbhaktis Urmi came suddenly Sanjay Rauts entourage from KCRs Solapur tour)

संजय राऊत म्हणाले की, बाजूच्या राज्यात मुख्यमंत्री आज महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. आधी आंध्रमध्ये मंत्री होते, मग स्वातंत्र तेलंगणा राज्यात ते मुख्यमंत्री झाले, पण त्यांना विठ्ठल भक्तीची उर्मी अचानक आता आली, ही मोठी एक गंमतीची गोष्ट आहे. विठ्ठलभक्ती ही अख्या देशभरात, जगभरात आहे. पण हे महाशय जे आमचे मित्र आहेत. त्यांना उर्मी आली आणि पाचशे सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन ते निघाले आहेत. ते पंढरपुरच्या वारीमध्ये कुठलं शक्तीप्रदर्शन दाखवत आहेत आणि त्याचं जे पायघड्या घालून स्वागत चाललं आहे या सरकारकडून, ते पाहून याच्यामागे फार मोठं राजकीय कारस्थान आहे आणि त्यासाठी आमच्या विठोबा माऊलीचं त्याच्या आडून हे सर्व राजकारण आता करत आहेत, अशी शंका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आम्हाला त्रास देण्यासाठी हे नवीन एमआयएम आले

संजय राऊत म्हणाले की, केसीआर यांचा पक्ष आधी प्रादेशिक होता. मग तो त्यांनी राजकीय पक्ष केला अचानक आणि कुठे घुसत आहेत तर महाराष्ट्रात. इतर ठिकाणी ओडीशा, इतर राज्यात, उत्तर प्रदेश नाही तर महाराष्ट्रात. महाराष्ट्रात का तर इथे महाविकास आघाडी फार भक्कम आहे. आम्ही एकत्र लढलो आणि लढतोच आहोत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मिंधे गटाची दाणादाण उडेल. मागच्या वेळेला एमआयएमला पाठवलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्रास देण्यासाठी आणि हे नवीन एमआयएम आले आहेत. केंद्र बिंदू एकच हैदराबाद, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अचानक महाराष्ट्रात पैशांचा ओघ कसा वळला

मग सोलापूरात इकडे तिकडे हजारो शेकडो कोटींचे बॅनर, होर्डिंग, प्रसिद्धी चौकशी करा हे अचानक महाराष्ट्रात पैशांचा ओघ कसा वळला आहे. कोणी मागणी केली आहे का या चौकशीची. हा पैसा महाराष्ट्रात कुठुन आला, लोकांना कसा मिळतो, कोणत्या मार्गाने मिळतो, हवालाने मिळतो का अन्य मार्गाने मिळतो, याची चौकशी व्हायला पाहिजे.

- Advertisement -

केसीआर यांची नियत चांगली नाही

संजय राऊत म्हणाले की, राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूका लढवायचा अधिकार आहे. हे खरं असलं तरी केसीआर यांची नियत चांगली नाही. त्यांनी ठरवायला हवं ते नक्की कोणाला मदत करू इच्छितात. एका बाजूला ते म्हणतात देशात हुकुमशाही आहे. मोदींचं राज्य आम्हाला तेलंगणात काम करू देत नाही. त्यांच्या मुलीवर ईडीचा फास आहे. त्यांच्या काही सहकाऱ्यांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या. मग आपण सर्वांना एकत्र येऊन लढायचं या हुकुमशाहीविरोधात की हुकुमशाहीला मदत होईल अशा पद्धतीने राजकारण करायचं. आम्ही लढतो आहोत. आम्ही 17-18 लोकं जाऊन आलो पाटण्यामध्ये. आमचा निर्णय आहे आम्ही लढू, पण केसीआर नव्हते, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -