घरताज्या घडामोडीHSC SCC Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार,...

HSC SCC Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार, बोर्डाकडून भूमिका स्पष्ट

Subscribe

विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले नाही. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा केंद्रेही वाढवण्यात आली आहेत. यामुळ विद्यार्थ्याला ज्या शाळेत शिक्षण घेत आहे त्याच शाळेत परीक्षा देता येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील २ वर्षे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बोर्डाची लेखी परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेतली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. परंतु आता विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यावर बोर्ड ठाम आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसारच दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा देता येणार असून परीक्षेसाठी अर्धा तास वेळ वाढवून देण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्व काळजी घेण्यात येणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परीषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असून यंदा परीक्षा ऑफलाईन तसेच प्रत्यक्षात घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना काही सवलती दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले नाही. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षा केंद्रेही वाढवण्यात आली आहेत. यामुळ विद्यार्थ्याला ज्या शाळेत शिक्षण घेत आहे त्याच शाळेत परीक्षा देता येणार आहे.

- Advertisement -

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होमार आहे. तसेच विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यांची संधी हुकली तर अपरिहार्य कारण असेल तर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14 लाख 52 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज आले असल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले.

दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात आला असल्यामुळे परीक्षा उशीरा घेण्यात येत आहेत. अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्याची परीक्षा 40 टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी जादा वेळ

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र करण्यात येणार आहे. ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच शाळेत विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना झिगझॅग पद्धतीने आसनव्यवस्था असेल. तसेच 40 ते 60 मार्कांच्या लेखी परीक्षेसाठी 15 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर 70 ते 80 मार्कांच्या पेपरसाठी 30 मिनिटांचा वेळ वाढवूव देण्यात येणार आहे.


हेही वाचा : BMC Budget 2022 : मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण बजेट ३,३७० कोटींचे, टॅब, व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी मोठी तरतूद

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -