घरताज्या घडामोडीBMC Budget 2022 : मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण बजेट ३,३७० कोटींचे, टॅब, व्हर्च्युअल...

BMC Budget 2022 : मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण बजेट ३,३७० कोटींचे, टॅब, व्हर्च्युअल ट्रेनिंगसाठी मोठी तरतूद

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे बजेट ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०२२-२३ आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी तर उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजे २७१०.७७ कोटी आहे. 

मुंबई महानगरपालिकेकडून २०२२-२३ वर्षाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. महानगरपालिकेतील शाळेतील मुलांना टॅब, व्हर्च्युअल क्लासरुम तसेच दोन शाळांच्या इमारत बांधकामासाठी महापालिकेनं मोठी तरतूद केली आङे. यंदाच्या बजेटमध्ये महानगरपालिकेनं मुलांना डिजिटल शिक्षण देण्यावर भर दिला आहे. यासाठी लागणाऱ्या लागणाऱ्या गोंष्टींची खरेदी करण्यासाठी निधीती तरतूद करण्यात येणार आहे. मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. व आय. बी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे बजेट ३ हजार ३७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून २०२२-२३ आर्थिक वर्षाकरिता महसुली उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज २८७०.२४ कोटी तर उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजे २७१०.७७ कोटी आहे.

महानगरपालिकेमार्फत शैक्षणिक सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, तेलगू, तमिळ व कत्रड अशा आठ माध्यमांच्या ९६४ प्राथमिक शाळेमधील २४२८९९ विद्यार्थ्यांना ६८३१ शिक्षकांमार्फत मोफत शिक्षण दिले जात आहे. तसेच २४३ माध्यमिक शाळांमधून एकूण ४८२०९ विद्यार्थ्यांना १३८३ शिक्षकांमार्फत मोफत शिक्षण दिले जात आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेतर्फे विशेष मुलांसाठी १७ विशेष शाळा सुरु असून या शाळांमधून एकूण ७३० विद्यार्थ्यांना ८१ शिक्षकामार्फत शिक्षण दिले जाते. महानगरपालिकेतर्फे ०२ अध्यापक विद्यालये चालविली जातात व त्यामधून १५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महानगरपालिकेच्या ३९४ खाजगी अनुदानित शाळांमध्ये २८३६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शाळांमधून इ. १ ली ते ४ थी पर्यंत एकूण ९८,७१९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महानगरपालिकेमार्फत मंजूर ९०० बालवाडी वर्गापैकी सद्यस्थितीत ८१५ बालवाडी वर्ग सुरु आहेत.

विद्यार्थ्यांना टॅबचा पुरवठा

बृहन्मुंबई महानगरपालिका शाळातील इयत्ता १०वी च्या १९,४०१ २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये अद्यावत अभ्यासक्रम अंतर्भूत असलेले पुरविण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. पुरविण्यात येणाऱ्या टॅबमध्ये इंटरनेट, Wi-n, अद्ययावत कंटेट लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (LMS), अधिक क्षमतेची बॅटरी, अद्ययावत सॉप्टवेअर व टॅबचे कन्हर यासारख्या सुविधा अंतर्भूत आहेत. यासाठी पालिकेने अर्थसंकल्पीय तरतूद (माध्यमिक) ७ कोटींची केली आहे.

- Advertisement -

मुलींचा उपस्थिती भत्ता (विद्यार्थीनीसाठी मुदत ठेव योजना)

वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता ८वी च्या एकूण १५,३५२ मुलीना उपस्थिती प्रोत्साहन भत्ता योजने अंतर्गत ₹५०००/- रकमेची मुदत ठेव प्रमाणपत्रे भारतीय डाक कार्यालयाद्वारे देण्याची कार्यवाही सुरु आहे. २०२२-२३ मध्ये मुलींच्या उपस्थिती प्रोत्साहन भत्त्याची मुदत ठेव प्रमाणपत्र देण्याची योजना सुरु राहणार आहे. प्राथमिकसाठी अर्थसंकल्पात ७ कोटी रुपयांची तरतूद तर माध्यमिकसाठी अर्थसंकल्पात ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालिकेतर्फे 2022-23 मधील नवीन योजना

केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. व आय. बी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व सर्वांगीण शिक्षण देण्याकरिता महाराष्ट्र बोर्डासह सीबीएसई, आयसीएसई या बोर्डाचे शिक्षण देण्यात येत आहे. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. अभ्यासक्रम जगातील शिक्षणाचे दर्जेदार माध्यम असून सदर बोर्डाचा अभ्यासक्रम सुरु केल्याने मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल.

तसेच आतंरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महापालिकेमार्फत विद्यार्थ्यांना देण्याकरिता आय.बी या अग्रगण्य आतंरराष्ट्रीय शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात चांगले करियर घडविण्यास मदत होईल. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नित आय.जी.सी.एस.ई. (International General Certificate of Secondary Education) व आय. बी (International Baccalaureate) बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


हेही वाचा : BMC Budget 2022 Live Updates : शाळांमधील आगीचे प्रकार रोखण्यासाठी पालिका अग्निशामक साहित्य उपकरणांची खरेदी करणार 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -