घरमहाराष्ट्रED च्या चौकशीसाठी हजर राहणार - एकनाथ खडसे

ED च्या चौकशीसाठी हजर राहणार – एकनाथ खडसे

Subscribe

येणाऱ्या ३० डिसेंबर अंमलबजावणी संचलनालय (ED) ने पाठवलेल्या समन्स नुसार मी चौकशीला हजर राहणार आहे. आतापर्यंत भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात चार वेळा चौकशी झाली आहे. मी पाचव्यांदा चौकशीला सामोरे जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना ही चौकशीची नोटीस पाठवण्यात आली आहे. इडीला जे काही सहकार्य लागेल, त्यासाठी मी मदत करणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आणखी चौकशी करण्याचा इडीला अधिकार आहे. त्यानुसार मी चौकशीसाठी हजर राहीन असे त्यांनी सांगितले.

भोसरी भूखंड प्रकरणात एन्टी करप्शन, आयकर विभाग, झोटींग समितीसमोर मी उपस्थित राहिलो आहे. विविध चौकश्यांना मी आदेशानुसार हजर राहिलो आहे. यापुढेही इडीला सहकार्य करेन. याआधी झालेल्या चारवेळा चौकशीतही मी सहकार्य केले आहे. भोसरीच्या भूखंडाचा संपुर्ण व्यवहार हा माझ्या पत्नीने केला आहे. पण तरीही एकत्र कुटुंब म्हणून माझ्या नावे ही नोटीस आली आहे. हा भूखंड ५ कोटी रूपयांचा असून रेडी रेकनरच्या दराने हा भूखंड खरेदी केला असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या क्षणाला काहीही बोलायचे नाही, यापुढच्या काळात मी वेळोवेळी माहिती देईनच असे त्यांनी स्पष्ट केले. याआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच इडीच्या चौकशीचे संकेत दिले होते. त्यावेळी माझ्यामागे इडी लावली तर मी सीडी लावेन असे विधान एकनाथ खडसे यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -