घरमहाराष्ट्रVijay Shivtare : शिवतारेंच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम; यावेळी डिपॉझिटच जप्त...

Vijay Shivtare : शिवतारेंच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम; यावेळी डिपॉझिटच जप्त करणार

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे. सध्या हा मतदारसंघ भलताच हॅपनिंग झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, घरातच असलेली लढाई. बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. ही सरळ लढत होईल असे वाटत असतानाच महायुतीतील आणखी एक घटक पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी अचानक येथून उमेदवारी जाहीर केली. यामुळे युतीतच थोडे संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. शिवतारेंचा अजित पवारांवर राग आहे. त्याच रोषातून त्यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून ते अपक्ष म्हणून लढणार आहेत. केवळ एवढ्यावरच हे सगळं थांबलेलं नाही तर आता विजय शिवतारे आणि अजित पवार गटात शाब्दिक फैरी झडताना दिसत आहेत.

हेही वाचा – Jyoti Mete : बीडमध्ये पंकजा मुंडेंना ज्योती मेटेंचे आव्हान; बुधवारी शरद पवार गटात प्रवेश

- Advertisement -

बारामती हा काही कोणाचा सात – बारा नाही, तिथे काय केवळ पवारांची मक्तेदारी आहे का, अशी विचारणा करत शिवतारे यांनी येथून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, या चर्चेतूनही काही तोडगा निघालेला नाही आणि शिवतारे यांनी अद्याप आपली उमेदवारी मागे घेतलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती.

‘माझा आवाका काय, माझी लायकी काय हे अजित पवारांना सांगतो असं म्हणत विजय शिवतारे यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावर आता अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शिवतारे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले सूरज चव्हाण

अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना गेल्यावेळी आम्ही सांगून पाडलं होतं, यावेळी आम्ही त्यांचं डिपॉजिट जप्त करू असं आव्हान सूरज चव्हाण यांनी दिलं आहे. ते पुढे म्हणाले,’विजय शिवतारे हे महायुतीच्या घटक पक्षातील आहेत. कोणीही निवडणुक लढवू शकतो. मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता, यावेळी सांगून त्यांचे डिपॉझिट जप्त करू. त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आम्हालाही पाहायचे आहे की शिवतारेंचा आवाका काय आहे?’ अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली.

हेही वाचा – Raj Thackeray Meet Amit Shah : भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार? अतुल लोंढेंचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -