घरठाणेमुंबई-नागपूर महामार्गात समृद्धी कोणाची ?

मुंबई-नागपूर महामार्गात समृद्धी कोणाची ?

Subscribe

ठाणे जिल्ह्यात पर्यायी मार्गिका न ठेवल्याने शेतकरी अडचणीत

कल्याण । मोठ्या थाटामाटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात नक्की समृद्धी कोणाची झाली, किंवा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण आदी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी पर्यायी मार्गिका न ठेवल्याने शेत शिवारात जायचे कसे? तसेच या महामार्गाशेजारील शिल्लक राहिलेल्या जमिनीचे आम्ही काय करु? अशा विविध अडचणी मुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.180 किमी ठाणे जिल्ह्यातील दुसर्‍या टप्प्याचे काम 80 टक्के संपले आहे. हे काम 5 जून 2022पर्यंत संपण्याची अपेक्षा होती. परंतु कोरोना दोन वर्षामुळे ते लांबले. आता हे काम जुलै 2023 पर्यत संपविण्याचे लक्ष आहे. यामध्ये सह बोगदे असून यातील एक बोगदा तब्बल 8 किमीचा देशातील सर्वाधिक रुंद असा साडेसात किमीचा वाशाळा बोगदा हा शहापूर तालुक्यात आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कल्याण, भिवंडी अशा तीन तालुक्यातील 77 किलोमीटर इतकी 771.07 हेक्टर जमीन संपादित केली आहे. यामध्ये 31.09 हेक्टर जमीन सरकारी मालकीची,242.21हेक्टर वनजमीन आहे. जिल्ह्यातील 40 गावातून हा महामार्ग जात आहे. या मार्गामुळे शेतीचे दोन तुकडे झाले आहेत.जमिनीचे 20 गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्राचे तुकडे झालेले 235 शेतकरी आहेत. भाऊबंदकी, वाद यामुळे आवश्यक असलेले एक क्षेत्र संपादित केले आहे.

गुंटेवारी नुसार त्याचा मोबदलाही दिला आहे. परंतु महामार्गाच्या शेजारील आवश्यक नसलेल्या क्षेत्राचा ताबा शेतकर्‍यांकडे ठेवला आहे, तो अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे या नापिकी क्षेत्राचे आम्ही काय करायचे? असा प्रश्न या परिसरातील शेतकर्‍यांना पडला आहे. शिवाय शेत शिवारात जाण्यासाठी पर्यायी मार्गिका न ठेवल्याने शेतात कसे जायचे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहापूर तालुक्यातील शेई, शेरा आदी गावातील तसेच कल्याणमधील ही काही गावातील शेतकर्‍यांची अशी अडचण झाली आहे. या संदर्भात काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी या शेतकरी वर्गाने सरकारकडे केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नुकतेच या मार्गावर शासकीय व्हीआयपींना टोलमाफी देण्यात आल्याचे समजते.परंतु जे बाधित झालेत त्यांना साधी पर्यायी मार्गिका मिळत नाही, यामुळे शेतकरी नाराज आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -