घरपालघररिक्षा प्रवाशांनो लक्ष ठेवा ! ..तर वाहनावर होणार कारवाई

रिक्षा प्रवाशांनो लक्ष ठेवा ! ..तर वाहनावर होणार कारवाई

Subscribe

कारवाईची आकडेवारी तर भली मोठी असते मात्र त्यांचे अर्धवट माहिती सारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

इरबा कोनापुरे, मीरा- भाईंदर: शहरात एकीकडे प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व वाहनांमध्ये वाहन चालका- मालकाची माहिती व हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील काही प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक त्यांच्या अर्धवट माहिती उपलब्ध करून प्रवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रवासी वाहनातून प्रवास करणार्‍या महिला स्वतःला असुरक्षित समजू लागल्या असल्याचे पल्लवी चव्हाण ( प्रवासी) यांनी सांगितले आहे. वाहतूक पोलिसांकडून दररोज रिक्षावर करण्यात येणार्‍या कारवाईची आकडेवारी तर भली मोठी असते मात्र त्यांचे अर्धवट माहिती सारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

प्रवासी वाहनातून प्रवास करताना महिलांवर विनयभंगासारखे कोणतेही प्रकार घडू नयेत याकरता मीरा- भाईंदर शहरात प्रवासी वाहतूक करणार्‍या सर्व रिक्षा, बस, टॅक्सी मध्ये वाहनचालकाची माहिती व प्रवाशांच्या मदतीकरता हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यास सांगण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून शहरात एक वेगळाच प्रकार घडत आहे. शहरातील काही रिक्षांमध्ये प्रवाशांकरिता उपलब्ध करण्यात येणार्‍या माहितीमध्ये स्टिकर वर फक्त हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आलेला असून त्या फॉर्मवर रिक्षा चालक-मालक यांचे फोटो देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र रिक्षा चालक हा कोणी तिसराच व्यक्ती असतो. यामुळे उद्या एखाद्या महिलेसोबत कोणता चुकीचा प्रकार घडला, तर अर्धवट व चुकीच्या माहितीमुळे संबंधीत व्यक्तीचा शोध घेणे पोलिसांना कठीण जाणार आहे.

- Advertisement -

प्रवासी वाहनांच्या आत लावण्यात आलेल्या फॉर्ममध्ये वाहन चालकाचे नाव, संपूर्ण पत्ता,फोन नंबर, लायसन्स नंबर व मुदत, परमिट धारकाचे नाव, पत्ता, परमिट नंबर, फोन नंबर, आधार कार्ड क्रमांक इत्यादी उपलब्ध असणारी माहिती योग्य आहे का? माहितीमध्ये देण्यात आलेली व्यक्तीच रिक्षा चालवत आहे का? यावर लक्ष ठेवणे वाहतूक पोलिसांचे काम आहे.
वाहतूक पोलिसांनी कारवाई दरम्यान रिक्षात लावण्यात आलेल्या महितीच्या फॉर्मवर देखील लक्ष द्यावे व माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्यास त्यावर करवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करू लागले आहेत. याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना विचारले असता त्यांनी रिक्षांची तपासणी करून स्टिकर चुकीचे असणार्‍या वाहनावर कारवाई करण्याबाबत कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याच बरोबर स्टिकर न लावणार्‍या वाहनावर सतत कारवाई चालू असल्याचे सांगितले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -