घरमहाराष्ट्रहीन दर्जाचे राजकारण सुरू, देवी प्रत्येकाचा हिशेब...; तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर गोऱ्हेंकडून नाराजी

हीन दर्जाचे राजकारण सुरू, देवी प्रत्येकाचा हिशेब…; तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर गोऱ्हेंकडून नाराजी

Subscribe

धाराशिव : नवरात्रीनिमित्त शिंदे गटाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, हीन दर्जाचे राजकारण सुरू आहे, परंतु देवी प्रत्येकाचा हिशोब करत असते. (Inferior politics continues Devi is accountable to everyone Displeasure from Neelam Gore after having darshan of Tuljabhavani)

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना नियम व अंमलबजावणी बाबत सूचना दयायला हव्यात. काही जण पुजाऱ्यांवर कारण नसताना दबाव आणत आहेत. सध्या राज्यात हीन दर्जाचे राजकारण सुरू आहे, ते चुकीचे आहे. परंतु देवी प्रत्येकाचा हिशेब करत असते, अशी स्पष्ट भूमिका नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – “नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…” विधानसभा अध्यक्षांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

याआधीही नीलम गोऱ्हेंकडून नाराजी 

या आधीदेखील नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शन व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. महिलांना देवीची आराधना करण्याच्या परवानगीविषयी बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, सामान्य महिलांना तर नाहीच, परंतु मलाही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला होता, हा दुजाभाव असल्याचे त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या मंदिरात भक्तांची गर्दी

चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जात असून, महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी भाविकांची गर्दी होत असते. दरवर्षी येथे येणार्‍या भाविकांसाठी श्री तुळजाभवानी देवस्थान ट्रस्टतर्फे श्रीसुक्तपठण, महिलांकडून महाआरती, भावगीते व भक्तीगीतांचा कार्यक्रमांचे आयोजन असते. तुळजाभवानी मंदिर हे मंदिर प्राचीन देवस्थानापैकी एक मानले जाते.

हेही वाचा – खासदार शेवाळे VIP असल्याचा वकिलांचा दावा; दंडाधिकाऱ्यांनी सुनावले खडे बोल, म्हणाले, कोर्टापुढे सगळेच …

तुळजाभवानी मंदिरातील साजरे होणार कार्यक्रम
  1. 18 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना
  2. 19 ऑक्टोबर रोजी “ललिता पंचमी” देवीची पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबीना
  3. 20 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना
  4. 21 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, भवानी तलवार अलंकार महापूजा व रात्री छबीना
  5. 22 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 3 वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, रात्री 8.10 वाजता पुर्णाहुती, रात्री छबीना
  6. 23 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री  नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक
  7. 24 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त उषःकाली देवीची शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
  8. 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा
  9. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा
  10. 30 ऑक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबीना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -