घरताज्या घडामोडीबाजारपेठेतील गर्दीमुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण

बाजारपेठेतील गर्दीमुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण

Subscribe

निर्बंधांबाबत प्रशासन करणार फेरविचार

कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. मात्र अनेकांनी चुकीचा अर्थ लावत शहरातील बाजारपेठ आणि दुकानांमध्ये गर्दी केली. बुधवारी सलग दुसर्‍या दिवशीही बाजापेठांमध्ये गर्दीचा महापूर दिसून आला. जणू कोरोना पूर्णपणे संपल्याच्या अर्विभावात नागरिक वावरत होते. केवळ निर्बंध शिथिल झाले कोरोना नाही हे सांगण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

ब्रेेक द चेन अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. दीड महिन्यापासून सर्व उद्योगधंदे, दुकाने बंद असल्याने व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली होती. अनेकांचा रोजगार गेल्याने कुटुुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र अर्थचक्राला गती देण्यासाठी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्हयात निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. दीड महिन्यानंतर सर्वच दुकाने उघडल्याने शहरवासीयांनी सलग दुसर्‍या दिवशीही सकाळी बाजारपेठ आणि दुकानांमध्ये तुफान गर्दी केली. रविवार कारंजा, शालीमार, मेनरोड, भद्रकाली, कानडे मारूती लेन आदी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एकूणच ही गर्दी पाहता शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नियमांचे पालन करा
कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या नियमांचे पालन न केल्यास कोरोनाला पुन्हा आमंत्रण देऊ शकते.

थोडी खुशी , थोडा गम
तब्बल दीड महिन्यानंतर दुकाने सुरू झाल्न्याने व्यावसायिकांनी या निर्णयाचे स्वागत तर केले पण केवळ चार तासच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने थोडी नाराजीही व्यक्त केले. सर्व व्यवसाय सुरू करतांना सलून व्यावसायिकांना मात्र दुकाने सुरू करण्यास परवानगी नसल्याने सूलन व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

या चुकांमुळे पुन्हा संसर्गाचा धोका
निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांनी वाहतूक कोंडी होईपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी केली. या गर्दीतून अनेकांनी कोरोना घरी नेला असण्याची शक्यता आहे.

कोरोना साखळी तोडण्यासाठी मास्क आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आता तर डबल मास्क वापरण्याच्या सूचना आहेत. मात्र अनेक नागरिक मास्क हनुवटीवरच लावतांना दिसत आहेत.

गृह विलगीकरणातील रूग्ण बाहेर फिरून संसर्गास कारणीभूत ठरू शकतात.

या गर्दीत वैयक्तिक काळजीचा भर ओसरलेला दिसून आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -