घरमहाराष्ट्रIrshalwadi landslide : राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच इर्शाळवाडीबाबत केलेले विधान खरं ठरलं

Irshalwadi landslide : राज ठाकरेंनी महिनाभरापूर्वीच इर्शाळवाडीबाबत केलेले विधान खरं ठरलं

Subscribe

Irshalwadi landslide : रायगडच्या खालापूरनजीक इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर  दरड कोसळल्याने (Irshalwadi landslide) अनेक घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली असून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अद्यापही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. सध्या स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहिम सुरू असून मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे अडचणी येत आहे. अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात असून घटनेनंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या दुर्घटनेनंर मनसेकडून एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महिनाभरापूर्वीच इर्शारवाडीबाबत एक विधान केले आहे. (Irshalwadi landslide Raj Thackerays statement about Irshalwadi a month ago came true)

हेही वाचा – Irshalwadi landslide : मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, जखमींवर सरकारी खर्चाने उपचार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

- Advertisement -

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 11 जून 2023 चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना वक्तव्य केले होते की, यावर्षीच्या पावसात कदाचित कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील अस दिसत आहे. यासाठी शासन आणि प्रशासनाने जागृत राहावे, तसेच प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. इर्शारवाडी दुर्घटनेनंतर त्यांचे विधान खरे ठरल्याचे पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळवाडीत दरड कोसळून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, 98 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. परंतु अद्यापही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मनसेकडून व्हिडीओ शेअर करताना पोस्ट करताना म्हटले आहे की, 20 जुलै 2023 रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी. महाराष्ट्र सरकारनं अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्युमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाडी-वस्तीचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ञांचा सल्ला घेऊन एक ‘पुनर्वसन योजना’ आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी, याबाबत योजना आखावी, अशी मागणी मनसेकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा – Irshalwadi landslide : दुर्घटनेबाबत सर्व पक्ष, आमदारांनी एकत्र येऊन चर्चा करणं गरजेचं – आदित्य ठाकरे

इर्शाळवाडी संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते

रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना काल (19 जुलै) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत गावातली अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशीन घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत. दोन हेलिकॉप्टरही रेक्स्यू ऑपरेशनसाठी तयार आहेत, मात्र खराब हवामानामुळे ते अजूनही उड्डाण करू शकले नाहीत. इर्शाळवाडीमध्ये एकूण 48 कुटुंब राहत असून तेथील लोकसंख्या 228 एवढी आहे. मात्र अनेक लोक नोकरीच्या कामानिमित्त बाहेर गावी जात असतात, त्यामुळे ही दुर्घटना घडली त्यावेळी वाडीत नक्की किती लोक होती हे समजू शकलेले नाही. मुख्य म्हणजे इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -