घरमहाराष्ट्रराज्यात कायदा - सुव्यवस्था आहे का?, विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला सवाल

राज्यात कायदा – सुव्यवस्था आहे का?, विरोधी पक्षनेत्यांचा सरकारला सवाल

Subscribe

मुंबई – आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतीम आठवडा प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी आमदारांवर गंभीर टीका केली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का अशा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 50 मिटरवर डान्सबार आणि हुक्का पार्लर सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

सरकार चूकत असेल किंवा दुर्लक्ष होत असले तर अशा ठिकाणी बोट ठेवण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. म्हणून आज या विषयात वेगवेगळे विषय अंतीम आठवडा प्रस्तावात मांडलेले आहेत. आताचे सरकार येऊन फार दिवस झालेले नाहीत. पण 50 दिवसाच्या कालावधीचा आढावा घेतला तर कायदा आमि सुव्यावस्थेचा कसा बाजा वाजला आहे हे आपल्या लक्षात येईल कायदा सुव्यावस्थेचा बोजवारा उडत असताना ज्याज्या प्रकारचे गुन्हे असतात त्यातील एकही गुन्हा मागच्या 50 दिवसात घडाला नाही असे झालेले नाही. उलट असे गुन्हे अटना घडल्या यातून आपल्या सगळ्यांना लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जे भंडारा गोंदीयात झाले त्याविषयी आपण चर्चा केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? कायद्याचे राज्य आहेका हा प्रश्न निश्चीत निर्माण होतो. गुन्हे कोणत्या कोणत्या प्रकारचे घडत आहेत. एकखादी घटना घडली तर समजू सकतो. पण घटना घडत असताना असे वाटते की गुन्हे गारांना कायद्याची भिती उरलेली नाही, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

- Advertisement -

आमदारांच्या गोंधळावर विरोधी पक्षनेते काय म्हणाले –

लोकशाहीच्या दृष्टीने विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा आधीकार आहे. विरोधी पक्ष आंदोलन करत असतात- काल तुम्ही करत होता आज आम्ही करतो. आंदोलनाचा आधीकार असताना आज एक आमदार आमच्यावर काय कोणी हात उचलणार आम्हीच उचलू, असा खुलेआम मिडीया समोर एक आमदार बोलले आहेत. सत्तेचा एवढा माज. आंदोलन विरोधी पक्षाला करायचा अधिकार नाही. गद्दार म्हणायचा अधिकार नाही. जर गद्दारी केली तर याला घाबरता का ? गद्दारी केलीच आहे. त्याला जर कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर दादागीरी करण्याचा प्रकार आज सकाळी घडलेला आहे पण सभापती मोहोदया  ही दादागीरी महाराष्ट्र सहन करणार नाही. असे दादागिरी करणारे अनेक लोक अनुभवलेले आहेत.म्हणून या अनेक लोकांना महाराष्ट्रातील जनतेने व्यवस्थित त्यांचे काम करायचे ते केले आहे.

- Advertisement -

आज सत्ताधारी पक्षाचा पदाधीकारी खुलेआम सांगतो की इडी याच्यावर कारवाई करणार आहे. याला महीन्याभरात  ईडी अटक करणार आहे. याच्यावर ईडी कारवाई करणार आहे. आणि मग हे खुलेआम दिसत असताना मोहीत कंबोज असे म्हणतो त्याची कधी चौकशी करणार आहोत का. त्याचे कॉल डीटेल आपण बघना आहोत कामी एखाद्या ईडीच्या अधीकाऱ्यांने म्हटले तर मी समजू शकतो. परंतू भाजपचा पदाधीकारी कारवाई करणार. ईडी एक स्वतंत्र्य यंत्रणा आहे. केंद्राच्या आखत्यारीतील यंत्रणा आहे. मुंबईतील एक पदाधीकारी अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर कायदा सुव्यवस्था खऱ्या आर्थाने आहे का, असे अंबादास दानवे म्हणाले.

पुढे त्यांनी एकीकडे खुले पुरावे आहेत. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांचे वेगवेगळे विषय आपल्या समोर दिले. मुंबईचे एक खालच्या सभागृहातील आमदार असे म्हणतात जर कोणी दादागिरी केली तर त्याची तंगडी तोडू त्याचा कोथळा बाहेर काढू तुम्ही तंगडी तोडा मी तुमचा टेबल जामीन करतो. कोर्ट झालेत ते. उलट सरकार सुरक्षा त्यांना देते. ज्यांनी धमकी दिली त्यांना सुरक्षा नाही. जो धमकी देतो त्याला सुरक्षा सरकार देते, असे अंबादास दानवे म्हणाले

पुढे त्यांनी एकीकडे खुले पुरावे आहेत. सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांचे वेगवेगळे विषय आपल्या समोर दिले. मुंबईचे एक खालच्या सभागृहातली आमदार असे म्हणतात  जर कोणी दादागिरी केली तर त्याची तंगडी तोडू त्याचा कोथळा बाहेर काढू तुम्ही तंगडी तोडा मी तुमचा टेबल जमीन करतो. कोर्ट झालेत ते. उलट सरकार सुरक्षा त्यांना देते. ज्यांनी धमकी दिली त्यांना सुरक्षा नाही. जो धमकी देतो त्याला सुरक्षा सरकार देते, असे अंबादास दानवे म्हणाले

आमदारांवर गंभीर आरोप –

एक आमदार म्हणतात अधिकाऱ्यांना धमकी देतात. हे आमदार कोकणातले आहे. ते सांगतात तुला संपवतो घ्यारे याला बाजूला असे एक आमदार म्हणातात. त्याविषयी फिर्याद दिली गेली आहे.देवगडचे शिवाजी खरात आहेत यांनी पंधरा ऑगस्ट रोजी जवाब दिलेला आहे. त्यांनी यात आमदारांच्या कार्यकर्त्यांनी बाजूला घेऊन आम्हाला लाता बुक्यांनी मारले. गुडा राज चालू आहे का. बाकीच्या माणसाने कृत्य केले समजू शकतो पण एक आमदार अशा पद्धतीने वर्तन करत असेल कायद्याचे राज्य आपल्याकडे कशा पद्धतीने आहे हे बघण्याची आवश्यकता आहे.

एक आमदार दिवसा मध्यांन भोजन योजनेच्या आधीकाऱ्याला मारहाण करतो. भोजन योजनेबाबत चौकशीकरून सरकार कारवाई करेल. पण एक आमदार कर्मचाऱ्याला मारहाण करतो. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे. घटना आंबेडकरांनी बनवलेली आहे. त्याराज्यात आमदार अशा पद्धतीने वागतात या कडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

या आमदारांविरोधा पुरावे आहेत. हे पुरावे सगळीकडे आलेले आहे. सरकार तपासून बघू म्हणते. त्याच्या विरोधात एक घटना घडलेली आहे. या विरोधात एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात काही शिवसैनीकांवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यात झाले काय तर एका गाडीची काच फुटली होती. कोणाला लागले नाही. एक मंत्र्यांची गाडी होती. ज्यांने दगड फेकला असेल जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहीजे. यावर कोर्टाने सदर गुन्हा खोटा कसा आहे हे दिले आहे. आणि कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे. हे लोक आदित्य ठाकरे यांचा सभेच्या स्थळी होते, असे कोर्ट म्हणत आहे. यातून पूरावे असताना एका बाजूला कारवाई होत नाहीतर ज्याच्याविरोधात पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -