घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, उपमुख्यमंत्र्यात नंबर 'वन आणि टू' कोण? जयंत पाटलांचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, उपमुख्यमंत्र्यात नंबर ‘वन आणि टू’ कोण? जयंत पाटलांचा खोचक टोला

Subscribe

मुंबई – राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात आज मान्यता दिल्यानंतर अनेक नेत्यांनी सभागृहात निवेदन देत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विजय वडेट्टीवार यांचं कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

विरोधीपक्ष नेत्यांचं महत्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांकडं लक्ष देण्याऐवजी विरोधीपक्ष नेत्यांसंदर्भात होणाऱ्या वर्णनाच्या भाषणाकडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. यावर अजित पवार म्हणाले, आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडं आहे पण तुमचचं आमच्याकडं लक्ष नाही त्यावर मी काय करु. अजितदादांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मुख्यमंत्री विचलित न होता सर्वांची भाषणं ऐकत आहेत. पण दोन उपमुख्यंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण? आणि उपमुख्यमंत्री नंबर टू कोण?, असं म्हणत जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

- Advertisement -

विजय वडेट्टीवार हे विदर्भातील झुंजार आणि लढाऊ नेते आहेत. विरोधीपक्षाची आमदार म्हणून कामगिरी त्यांनी कामगिरी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली. यावेळी झुंजार व्यक्तीमत्व या ठिकाणी बसणं आवश्यक होतं आणि विरोधीपक्षाच्यावतीनं मला वाटतं एक झुंजार आणि खंबीर नेता आज तिथं बसला आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्राच्या प्रश्नांना ते योग्य न्याय देतील. महाराष्ट्राच्या समोर बरेच प्रश्न आहेत त्याला ते योग्य न्या देतील, असं जयंत पाटील म्हणाले.

सभागृहात वाचा फोडण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षनेते जागेवर असतील आणि खंबीर असतील तर अनेक प्रश्नांना या खुर्चीनं न्याय दिला आहे. मी गेल्या ३५ वर्षात हे पाहिलंय. नारायण राणेंचा सभागृहात मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. विरोधी पक्षाचा आणि सत्तारुढ पक्षाचा संबंध नेमही सौदार्यपूर्ण असला पाहिजे. दोघांनीही ऐकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : 2019 मध्ये ‘हे’ दोन नेतेच ठरले हीरो, फडणवीसांची सभागृहात टोलेबाजी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -