घरमहाराष्ट्रmansukh hiren death : विरोधकांचे आरोप चुकीचे, ATS तपास योग्य दिशेने सुरु...

mansukh hiren death : विरोधकांचे आरोप चुकीचे, ATS तपास योग्य दिशेने सुरु होता – जितेंद्र आव्हाड

Subscribe

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न - आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनसुख प्रकरणात केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, विरोधी पक्षातील अनुभवी नेत्यांनी मनसुख हिरेन प्रकरणात काही प्रश्न उपस्थित केले आहेत ते आश्चर्यकारक आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रुमालाचा उल्लेख नाही. परंतु पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शवविच्छेदनाचा अहवाल असतो. रुमाल हा जी मृतदेहासोबत मालमत्ता जप्त केली जाते त्यामध्ये पोलीस स्टेशनला पाठवली जाते. यानंतर ती मालमत्ता केंद्रीय लेबॉरेटरीला पाठवण्यात येते. भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे या संपूर्ण प्रकरणाची दिशा भरकटवत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आरोप खोडून लावले आहेत.

समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरा आणि फावना असतात (शेवाळ) झाड, पाने असे वेगवेगळे प्रकारचे घटक मानवी शरीरात जात असतात यामध्ये सगळ्या शेवटी जे शेवाळ शरीरात जातो तो बोन मॅरोमध्ये जातो. तो बोन मॅरो तपासल्यानंतर व्यक्ती बुडून मेला का याची माहिती मिळते. त्यामुळे याचा तपास केला जातो. एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे हे दाखले आहे. तपासात उगच संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरु असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सरकारी अधिकार्यांवर अविश्वास दाखवत त्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. कुंटेंनी रश्मी शुक्लांविरोधात अहवाल लिहिल्याने विरोधी पक्ष नाराज झाला आहे का? तुम्ही जे पहिले पान दाखवले त्यावर गोपनिय लिहिले आहे मग हे कस काय फुटले असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना विचारला आहे. हे सर्व संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे. एटीएसचा तपास योग्य रितीने सुरु होता. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने कुठेही केला नाही. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याचा बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आशिष शेलारांची राज्य सरकारवर टीका

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची दिशा भरकटवण्यात आली. हा राज्य सरकारचा हेतू होता, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -