घरमनोरंजन'या' अभिनेत्यानेही केला सोशल मिडियाला रामराम

‘या’ अभिनेत्यानेही केला सोशल मिडियाला रामराम

Subscribe

बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा आदर्श अनेक कलाकारांनी घेतला आहे.

सोशल मिडियावर हल्ली प्रत्येकजण सक्रिय असतो. याशिवाय आपल्या मूलभूत गरजांपैकी एक वाढलेली गरज म्हणजे सोशलमिडिया आहे. त्यातच जगात जे काही होईल त्याची माहिती आपल्याला सोशलमिडियामुळे एका क्लिकवर मिळते. तसेच कलाकारांचे अपडेट्स म्हणजेच त्या कलाकाराचा नवा चित्रपट कोणता येणार आहे कींवा कधी प्रदर्शित होणार याची माहिती सोशलमिडियामुळे मिळत असते. मात्र आता आमिर खानसह अनेक कलाकारांनी सोशलमिडियाला रामराम ठोकला आहे. त्यात आता आमिर खानचाच आदर्श घेत टेलिव्हिजनचा सुपरस्टार अभिनेता रवी दुबे हा सोशलमिडियापासून ब्रेक घेणार आहे. रवीने त्याचे इंस्टाग्राम अकांउंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील माहिती रवी दुबेने सोशलमिडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Dubey 1 (@ravidubey2312)

- Advertisement -

सोशलमिडियामुळे कलाकारांना त्यांची प्रायव्हसी गमवावी लागते. सोशलमिडियावरुन चाहत्यांशी कनेक्ट राहण्याच्या नादात कलाकार आपल्या खऱ्या आयुष्यातील जगणंच विसरतात. मात्र रवी दुबे सोशल मिडियाला रामराम करणार असला तरी हे केवळ काही दिवसांसाठीच असणार आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होण्याअगोदर एक मोठी घोषणा केली. सध्या या डिजिटल युगात प्रत्येकजण मिनिटा मिनिटाला आपला फोन चेक करत असतो. फोनमुळे कामात अडचण निर्माण होते. त्यामुळे आमिर खानने आता चित्रपट रिलीज होईपर्यंत फोनचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा आदर्श अनेक कलाकारांनी घेतला आहे.


हेही वाचा – पुण्यात लॉकडाऊन? ‘या’ तारखेला कठोर निर्णय घेणार; अजित पवारांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -