घरमहाराष्ट्रन्यायाचे रूपांतर सुडामध्ये होऊ नयेे

न्यायाचे रूपांतर सुडामध्ये होऊ नयेे

Subscribe

न्याय अगदी लगेच मिळणे शक्य नसते आणि न्यायाचे रुपांतर सुडामध्ये कधीही होऊ नये. कारण सूड कधीही न्याय देऊ शकत नाही. जेव्हा न्यायाचे रुपांतर सूडामध्ये होते, तेव्हा त्याचे न्याय म्हणून अस्तित्व संपुष्टात येते, असे सरन्यायाधीश बोबडे म्हटले आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हैदराबादमध्ये झालेल्या पोलीस एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर बोबडे यांच्या या विधानाला विशेष महत्त्व आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायदान प्रक्रियेत होणार्‍या दिरंगाईवरदेखील बोट ठेवले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात घडलेल्या घटनांमधून एका जुन्याच मुद्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये न्यायदान करताना होणार्‍या दिरंगाईबद्दल न्यायव्यवस्थेने पुन्हा एकदा विचार करण ेआवश्यक आहे. दिरंगाईच्या मुद्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा लागेल’, असं बोबडे यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, न्यायदान प्रक्रियेमध्ये होणार्‍या दिरंगाईमुळेच हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -