घरदेश-विदेशपीडितेची झुंज संपली!

पीडितेची झुंज संपली!

Subscribe

उन्‍नाव बलात्‍कार प्रकरण

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये बलात्कारपीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मोठ्या प्रमाणात भाजल्यानंतरही पीडितीने जगण्याची जिद्द बोलून दाखवली होती. पण उपचारादरम्यान तिने शुक्रवारी रात्री उशिरा ११ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. उन्नावमधील घटनेत पाच नराधमांकडून पीडित तरुणीला जिवंत जाळण्यात आले होते. यात ही तरुणी ९० टक्के भाजली होती. उन्नावमध्ये तिच्या अंगावर पेट्रोल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची झुंज अखेर अपयशी ठरली.

भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरने काही साथीदारांसह पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या पीडितेने आपल्याला न्याय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

- Advertisement -

त्यानंतर भाजपने या आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू होती. हैदराबादच्या आरोपींसारखीच शिक्षा आपल्या मुलीच्या आरोपींना देण्याची मागणी उन्नाव घटनेतील मुलीच्या वडिलांनी केली आहे. निदान त्यांना त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपल्याला मुलीच्या मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती, असेही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आले. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, असंही ते म्हणाले.

मला जगायचंय, गुन्हेगारांना सोडू नका
मला जगायचंय दादा, मला वाचवा आणि गुन्हेगारांना सोडू नका, अशी आर्त साद उन्नावमधील पीडितेने आपल्या भावाला घातली होती. ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाजल्यानंतरही तिने जगण्याची उमेद सोडली नव्हती. शर्थीच्या प्रयत्नानंतरही शुक्रवारी रात्री ११.४० वाजल्याच्या दरम्यान, व्हेन्टिलेटरवर ठेवलेल्या या तरुणीचा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. आम्ही तिच्या मृतदेहाचा दफनविधी करणार आहोत. जाळण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पीडितेच्या कुटुंबीयांना घर, २५ लाखांची मदत
उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना घर आणि २५ लाखांची मदत देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकराने केली आहे. पंतप्रधान आवास योजनेतून सदर तरुणीच्या कुटुंबीयांना घर देण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे. उन्नावचे जिल्हाधिकारी पीडित महिलेच्या कुटुंबीयांना भेटून आर्थिक मदतीचा धनादेश देणार आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -