घरताज्या घडामोडी'एके दिवशी कराचीच भारताचा भाग असेल'

‘एके दिवशी कराचीच भारताचा भाग असेल’

Subscribe

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचे नाव बदला अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर मांडली होती. पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिकेत तथ्य नसून ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. आता याच पार्श्वभूमीवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक दिवस कराचीच भारताचा भाग असेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘आमचा ‘अखंड भारत’ यावर विश्वास आहे. पण एके दिवशी कराचीच भारताचा भाग असेल असा देखील आमचा विश्वास आहे,’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

- Advertisement -

नितीन नांदगावकर यांनी वांद्र येथील असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली होती. कराची शहर पाकिस्तानामधील आहे. त्यामुळे या शहाराच्या नावाने भारतात दुकाने असल्याने आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो, असे नितीन नांदगावकर म्हणाले.

- Advertisement -

कराची बेकरी आणि कराची स्वीट्स ६० वर्षांपासून मुंबईसह देशात आहे. त्यांचा पाकिस्तानशी संबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला, ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते. यामुळे कराची बेकरीचे नाव बदलण्याच्या मुद्यावरून शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचे उघडपणे समोर आले होते.


हेही वाचा – महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता?; सेनेचा भाजपला खोचक सवाल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -