घरमहाराष्ट्रKhopoli Shingroba Utsav : खंडाळा घाटात शिंग्रोबा उत्सवाचा थाट

Khopoli Shingroba Utsav : खंडाळा घाटात शिंग्रोबा उत्सवाचा थाट

Subscribe

खंडाळा घाटात सर्वजण शिंग्रोबाला नमस्कार करून पुढे जातात. या शिंग्रोबाचा उत्सव बुधवारी साजरा करण्यात आला. यावेळी यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात अवघा खंडाळा घाट दणाणून गेला होता.

खोपोली : खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव आज (बुधवार) मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. समाज बांधवांच्या सहकार्यातून वीर हुतात्मा शिंग्रोबाचा उत्सव १६ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी उत्सव देवस्थान समिती प्रचंड मेहनत घेऊन उत्सव साजरा करते. या उत्सवात यंदाही यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात अवघा खंडाळा घाट दणाणून गेला होता.

सकाळी 6 वाजता मंदिरात भरत कोकरे यांच्या हस्ते श्रींचा दुग्धाभिषेक, महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर बबन खरात यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. सकाळी विकास मरगळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर शिळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिळफाटा ते सायमाळ मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरत भंडारा उधळण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : कर्जतमध्ये जलजीवन मिशन योजनांची झाडाझडती

शिंग्रोबाच्या उत्सवासाठी खंडाळा घाटातच ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन झाले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष डॉ.सुनील पाटील, दत्तात्रय मसुरकर, लोणावळ्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेनेचे पंकज पाटील, संदीप पाटील, दिनेश थोरवे, अमोल जाधव, तात्या रिठे, शेकापचे कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, डॉ.प्रवीण पोरवाल यांच्यासह खोपोली परिसरातील भाविक आणि धनगर समाज बांधव आवर्जून उपस्थित होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Matheran Tourism : माथेरानच्या पर्यटन उत्पन्नावर रेल्वेची नजर

सायंकाळी आरतीने शिंग्रोबा उत्सवाची सांगता करण्यात आली आणि त्यावेळी शिंग्रोबा उत्सव समितीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले. हा उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, बबन खरात, बाळासाहेब झोरे, बाळासाहेब आखाडे, दीपक आखाडे, नामदेव हिरवे आदींसह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधवांनी मेहनत घेतली होती.

(Edited by Avinash Chandane)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -