घरमहाराष्ट्रमहापौर आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; भायखळा पोलिसात तक्रार

महापौर आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; भायखळा पोलिसात तक्रार

Subscribe

पत्रात अश्लील मजकूर आणि धमकी, गृहमंत्र्यांकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याशी वाद सुरू असतानाच त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र महापौरांना आले आहे. या पत्रात खूप अश्लील मजकूर असून महापौरांसह कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व पत्राची गंभीर दखल घेऊन महापौर यांनी शुक्रवारी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

या संपूर्ण घटनाप्रकारामुळे महापौर आणि शेलार यांच्यातील वाद टोकाला पोहोचला असतानाच हा धमकी देणाऱ्या पत्राचा गंभीर प्रकार घडल्याने याकडे संशयाने पाहिले जात आहे. याबाबत माहिती देताना, महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, काल रोजी माझ्या जुन्या निवासस्थानी आलेले पत्र मला आज प्राप्त झाले. सदर पत्र उघडले असता, माझ्या विषयी अतिशय अश्लील भाषा वापरून मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील, असे पत्रात म्हटले आहे. माझ्या कुटुंबीयांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, या पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत शिविगाळ करण्यात आली आहे. सदर पत्रामध्ये माझ्याविषयी असलेला मजकूर हा अतिशय लज्जास्पद असून महिलांची विटंबना करणारा तसेच माझ्यासहित समस्त महिला वर्गाला वेदनादायी व क्लेशदायक असा आहे. सदर विषयाबाबत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र तसेच स्थानिक भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे.

सदर पत्रावर विजेंद्र म्हात्रे, असे नाव नमूद करण्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसातील घडामोडींचा विचार करता व प्राप्त पत्रातील मजकूर लक्षात घेता सदर व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे. तसेच मला व माझ्या कुटुंबीयांना त्वरित विशेष पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मी या पत्राद्वारे विनंती करीत आहे, असे महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी महापौर भावनाशील झाल्या होत्या. याप्रकरणी, भाजपतर्फे आमदार अतुल भातखलकर यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धमकीच्या पत्रातील भाषेने महापौर किशोरी पेडणेकर यांचे डोळे पाणावले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -