घरताज्या घडामोडीHasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून नवा वाद; हिंदुत्ववादी संघटना आणि...

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून नवा वाद; हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक

Subscribe

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. हसन मुश्रीफांच्या नावात राम शब्द दाखवल्याने या वादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या हसन मुश्रीफांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झाले आहे. याप्रकरणी भाजपचे नेते समरजीत घाटगे पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.

माहितीनुसार १० एप्रिलला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. संघाने पत्रकांचेही वाटप केले होते. याच जाहिरात आणि पत्रकांमध्ये मुश्रीफांच्या नावामध्ये राम या शब्द दाखवण्यात आला होता. याला हिंदुत्वावादी संघटना आणि भाजपने आक्षेप केला असून आज कागलमध्ये मोर्चा काढला आहे. तसेच याप्रकरणी भाजप नेते समरजीत घाटगे कागल पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले आहेत. दरम्यान आज काही कार्यक्रमानिमित्ताने हसन मुश्रीफही कागलमधील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

- Advertisement -

समरजीत घाटगे काय म्हणाले?

माध्यमांसोबत बोलताना समरजीत घाटगे म्हणाले की, ‘याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर मी पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये मी धक्कादायकबाब पुढे आणणार आहे. कोणीही कोणत्याही पक्षाचे असो प्रभू श्रीराम चंद्राचा असा अपमान हे कोणी सहन करणार नाही. हिंदू असेल, मुस्लिम असेल कोणीही असेल. आम्ही हे सहन करणार नाही.’

याप्रकरणावर हसन मुश्रीफ काय म्हणाले?

‘काल अचानकपणे अडीच वर्षांपासून गायब असलेले आणि झटका आल्याप्रमाणे उठलेले कुंडीतले झाडे बघितले. हे बघितल्यानंतर मी हे प्रकरण काय आहे ते पाहिले. ही गोकूळच्या संचालकांनी दिलेली जाहीरात आहे. या जाहिरातीसोबत माझा काही संबंध नाही. कदाचित माझ्या प्रेमापोटी जाहिरात दिली असावी. दरम्यान माझ्यावर गुन्हा कशासाठी नोंदवायचा आहे? हा एक प्रश्न आहे. अडीच वर्ष आपण अज्ञातवासात असल्यामुळे लोकांच्या समोर येण्यासाठी संधी पाहिजे आहे. कुणीतरी त्यांना उचकवलेले आहे. त्यामुळे ते अशापद्धतीने धाडस करतायत, हे धाडस त्यांना पुढच्या काळात महागात पडणार आहे,’ असे हसन मुश्रीफ म्हणाले

- Advertisement -

हेही वाचा- Hanuman Chalisa: राज ठाकरेंच्या मशीदीच्या भोंग्यांविरोधातील अल्टीमेटमचा इफेक्ट यूपीत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -