घरमहाराष्ट्रकोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करणार; मृद, जलसंधारण...

कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करणार; मृद, जलसंधारण मंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

रायगड जिल्हयातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल लघु पाटबंधारे योजनेमुळे येथील स्थानिकांना फायदा होणार असल्याने या योजनेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बुधवारी दिली.

गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आज पोलादपूर येथील कोतवाल प्रकल्पाच्या आढावा संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार भरतशेठ गोगावले, विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे, जलसंधारणाचे अतिरिक्त आयुक्त सुनील कुशिरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

कोतवाल लघु पाटबंधारे योजनेचे काम मृद आणि जलसंधारण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येईल. यासाठी आवश्यक असलेले भूसंपादन पूर्ण करणे, स्थानिक शेतकऱ्यांना मोबदला देणे ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येतील. याशिवाय चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी आवश्यक असलेली सुधारीत प्रशासकीय मान्यता घेऊन योजनेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही गडाख यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून या योजनेचे काम सुरु असून हे काम यावर्षी पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित विभागाने कालबध्द आराखडा तयार करावा. या योजनेअंतर्गत काम पूर्ण करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाही आणि योजनेचे काम थांबणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी सूचना प्रवीण दरेकर यांनी बैठकीत केली.


Railway Ticket Booking: प्रवाशांना दिलासा! रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -