घरदेश-विदेशRailway Ticket Booking: प्रवाशांना दिलासा! रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

Railway Ticket Booking: प्रवाशांना दिलासा! रेल्वेच्या तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

Subscribe

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासी एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकीट बुक करू शकणार आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासी एका महिन्यात पूर्वीपेक्षा जास्त तिकीट बुक करू शकणार आहे. भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून ही सुविधा देत आहे. त्यामुळं प्रवाशांना आता रेल्वे तिकीट बुकींग करणं आणखीनच सोपं होणार आहे.

‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून याआधी प्रवाशांना एका महिन्यात केवळ 6 तिकीट बूक करता येत होत्या. मात्र, आता नव्या नियमावलीनुसार, एका महिन्यात 12 तिकीट प्रवाशांना बूक करता येणार आहेत. ‘आयआरसीटीसी’ या अॅपमध्ये संबंधित प्रवाशाने आपले आधार कार्ड ‘आयआयसीटीसी’शी लिंक केले असेल, तर त्याला या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.

- Advertisement -

‘आयआरसीटीसी’शी आधार लिंक असं करा

  • प्रथम IRCTC च्या अधिकृत ई-तिकीटिंग वेबसाइट irctc.co.in वर जा.
  • यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • होम पेजवर दिसणार्‍या ‘माय अकाउंट सेक्शन’ वर जाऊन ‘आधार केवायसी’ वर क्लिक करा.
  • त्यानंतर पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
  • आता तुमच्या आधार कार्डसोबत नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • हा OTP टाका आणि पडताळणी करा.
  • आधारशी संबंधित माहिती पाहिल्यानंतर खाली लिहिलेल्या ‘Verify’ वर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की KYC तपशील यशस्वीरित्या अपडेट झाला आहे.

तिकीट बुक करण्‍यासाठी प्रवाशाने आधारशी आपले प्रोफाईल पडताळणे फार महत्वाचे आहे. हे मास्टर लिस्ट अंतर्गत ‘माय प्रोफाइल’ टॅबमध्ये दिलेले आहे. तिकीट बुक करण्यापूर्वी, येथे प्रवाशाचे नाव आणि आधार कार्ड तपशील देऊन मास्टर लिस्ट अपडेट करा.

- Advertisement -

हेही वाचा – जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर संतापले ओवैसी, म्हणाले या भ्याडपणासाठी मत दिलंय का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -