घरमहाराष्ट्रLatur Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू

Latur Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू

Subscribe

लातूर : देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांचा लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झाला. नांदेड-लातूर महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारी कार ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात  कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून कारमधील चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमी तरुणाला लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Latur Accident 4 friends left for Devadarshan are killed Died on the spot in a terrible accident)

हेही वाचा – Loksabha Election 2024 : “लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही”, शिंदे गटाच्या दोन आमदारांची माहिती

- Advertisement -

कारमधील सर्वजण तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिरात दर्शनासाठी जात होते. परंतु कार भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार लातूर-नांदेड महामार्गावरील महालंग्रा गावाजवळ पहाटे 3 वाजताच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सांगितले की, कारने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दिलेली धडक एवढी भीषण होती की कारचा पुढील भाग चक्काचूर होऊन तुटला आहे. तसेच कारमधून प्रवास करत असलेले मोनू बालाजी कोतवाल (27), शिवराज हरिश्चंद्र लंकाधाई (26), कृष्णा मांडके (24) आणि नरमन राजाराम कात्रे (33) हे जागीच ठार झाले असून शुभम लंकाधाई हा तरुण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातातील सर्व मृत तरुण हे नांदेड येथील रहिवासी आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : ‘…तर 2019मध्येच राष्ट्रवादी फुटली असती’, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट

साताऱ्यातही दोघांचा मृत्यू

दरम्यान, आज कास पठाराहून सातारा शहराकडे जात असताना एका कारचा अपघात झाला आहे. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. संबंधित कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे कारचे माेठं नुकसान झाले असून या अपघातात दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -