घरमहाराष्ट्रLoksabha Election 2024 : "लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही", शिंदे गटाच्या दोन आमदारांची माहिती

Loksabha Election 2024 : “लोकसभेच्या 22 जागांसाठी आग्रही”, शिंदे गटाच्या दोन आमदारांची माहिती

Subscribe

लोकसभेच्या जागावाटपाबाबत तडजोडीचे अधिकार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.  

मुंबई : लोकसभेच्या 22 जागांवर लढण्यासाठी आम्ही आग्रही आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीची समन्वय समिती घेणार असल्याचे देखील शंभूराज देसाईंनी म्हटले आहे. तसेच जागावाटपाबाबत तडजोडीचे अधिकार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.

जागावाटपाबाबत शंभूराज देसाई म्हणाले, “2019च्या लोकसभा निवडणुकीत 22 जागांवर निवडणूक लढली होती. यावेळी शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढली होती. त्याच 22 जागा याही निवडणुकीत शिवसेनेला मिळाव्यात, यासाठी आम्ही आग्रही आहोत. आमची भूमिकाही आमच्या पक्षातील मुख्य नेत्यांकडे मांडू. ज्यावेळी महायुतीची सर्व समन्वय समिती एकत्र बसेल, त्यावेळी अंतिम निर्णय होईल.”

- Advertisement -

हेही वाचा – Anil Deshmukh : माझ्याकडेही पेनड्राइव्ह बॉम्ब… अँटिलियाचा मास्टरमाइंड परमबीरसिंहच; अनिल देशमुखांचा दावा

तडजोडीचा अधिकार फक्त मुख्यमंत्री शिंदेंकडे – शिरसाट

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाचे सूत्र ठरवतील आणि यानंतर जागावाटपाची माहिती सर्वांच मिळेल. त्यामुळे आज 10, 20 आणि 22 जागा करण्यात काहीही अर्थ नाही. 2019 मध्ये लोकसभेवर ज्या जागा लढविल्या आहेत. त्या 22 जागांवर आम्ही ठाम आहोत. पण याबाबत तडजोडीचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेंना आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -