घरमुंबईAsim Sarode : 'तुला काय स्वप्न पडलं का?'...लैंगिक अत्याचाराच्या सरोदेंच्या आरोपांना शिवसेनेचे...

Asim Sarode : ‘तुला काय स्वप्न पडलं का?’…लैंगिक अत्याचाराच्या सरोदेंच्या आरोपांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 आमदारांनी जुलै 2022 रोजी बंड थेट गुवाहाटी गाठले होते. या गोष्टीला आता बराच काळ लोटला असला तरी ठाकरे गटाचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी रविवारी धाराशीमध्ये पार पडलेल्या ‘निर्भय बनो’ सभेमध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे. दरम्यान, असीम सरोदेंच्या आरोपांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (What did you dream Shiv Senas response to Asim Sarodes allegations of sexual harassment)

हेही वाचा – Ajit Pawar : आता पुन्हा एकत्र येणे नाही…अजित पवारांनी अनेकांची शंका केली दूर

- Advertisement -

असीम सरोदेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल करत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळाली नाही. त्यांनी म्हटले की, दोन आमदारांना मारहाण झाली. एवढे सगळे आमदार आम्ही सोबत होतो. त्यामुळे प्रत्येकाला जाऊन विचारा कुणाला मारहाण झाली. खरं तर आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही, असा त्यांचा समज आहे. एका एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा आरोप केला. पण तुला काय स्वप्न पडलं का? सगळे पोलीस, सुरक्षा व्यवस्था, माध्यमं तिथे असताना असं कसं होईल? दीड वर्षांनंतर याला जाग आली? असा सवाल करत बेछूट आरोप करणाऱ्यांकडे लक्षच देऊ नये. उबाठा गटाचे नेते खूश होतील या भावनेतून यांनी हे आरोप केले आहेत. मात्र आम्ही त्यांच्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा –Ajit Pawar : आता पुन्हा एकत्र येणे नाही…अजित पवारांनी अनेकांची शंका केली दूर 

- Advertisement -

असीम सरोदे काय म्हणाले?

दरम्यान, धाराशिव येथील ‘निर्भय बनो’ सभेत दावा करताना असीम सरोदे म्हणाले की, गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले होते. 8 किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं आणि हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली? असा सवाल करत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला. हा आरोप करताना त्यांनी कोणात्याही आमदाराचं नाव घेतल नाही. पण यावेळी त्यांनी भाषणात शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांचा उल्लेख करताना म्हटले की, गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस थांबल्या होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही, असे आव्हान असीम सरोदे यांनी उपस्थितांना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -