घरमहाराष्ट्रगुणरत्न सदावर्तेंनी दिली एसटी संपाची हाक, पण कर्मचारी देणार का साथ?

गुणरत्न सदावर्तेंनी दिली एसटी संपाची हाक, पण कर्मचारी देणार का साथ?

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गणेशोत्सवामध्ये संप केला होता. 11 सप्टेंबरला या संपाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर दोन दिवसांत हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गणेशोत्सवामध्ये संप केला होता. 11 सप्टेंबरला या संपाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर दोन दिवसांत हे आंदोलन मागे घेण्यात आले. पण आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा कोणत्याही संघटनेकडून करण्यात आली नसून नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग आणि त्याशिवाय इतर काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी सदावर्ते यांच्याकडून हा संप पुकारण्यात आला आहे. परंतु, या संपाला एसटी कर्मचारी ऐन दिवाळीच्या तोंडावर पाठिंबा देतात की नाही, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. (Lawyer Gunaratna Sadavarte announced the ST strike for various demands)

हेही वाचा – राज्यात आज 2369 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, मतदानाला सुरुवात

- Advertisement -

सातवा वेतन आय़ोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत नविन समिती स्थापन करावी, त्या समितीसमोर कर्मचाऱ्यांचे मत मांडण्याची सुविधा देण्यात यावी, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागण्यांसाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळातील सुमारे 85 टक्के बस नादुरुस्त असल्याने रस्त्यावर चालण्यास अयोग्य आहेत. अनेक गाड्यांचे इन्शुरन्स नाहीत, त्यामुळे गाड्या रस्त्यावर चालविणे धोक्याचे असून ते प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, असे सदावर्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 2021मध्ये जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी 54 दिवसांचा संप पुकारला होता, तेव्हा सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना सुरू करत त्यांनी या लढ्यामध्ये उत्स्फुर्तपणे उडी घेतली. त्यामुळे आता सदावर्ते यांनी या संपामध्ये 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 48 टक्के महागाई भत्ता दिला आहे. परंतु अद्याप थकबाकी दिलेली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, अन्यथा सोमवार (ता. 08 नोव्हेंबर) सकाळपासून रस्त्यावर एकही एसटी धावणार नाही आणि त्या दिवसाचा पगार मात्र महामंडळाला कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल, असा थेट इशाराही गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून देण्यात आलेला आहे. परंतु, अशा प्रकारच्या संपाची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या संपाला नेमके किती एसटी कर्मचारी पाठिंबा देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -