घरमहाराष्ट्रनागपूरLok Sabha 2024 : दोन महिन्यांनी आमची सत्ता, तेव्हा नारायण राणे तिहारमध्ये...

Lok Sabha 2024 : दोन महिन्यांनी आमची सत्ता, तेव्हा नारायण राणे तिहारमध्ये – संजय राऊत

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असा दावा केला होता. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन महिन्यात आमची सत्ता येणार आहे. तेव्हा नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राणे आणि ठाकरे अशा वाद रंगला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच अटक होणार असा दावा केला होता. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन महिन्यात आमची सत्ता येणार आहे. तेव्हा नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील, असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Lok Sabha Election 2024 After two months our power then Narayan Rane in Tihar Jail Sanjay Raut)

उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. असे असले तरी खासदार संजय राऊत हे आजपासून पुढील तीन दिवस सांगली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सांगलीत पोहचल्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर भाष्य करताना म्हटले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळतं आहे आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागलं पाहिजे. रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? आता तिथे आम्ही त्याचं काम करू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाठिंबा; आनंदराज आंबेडकरांची वंचितच्या पत्रावर आगपाखड

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नेत्यांना आम्ही सांगलीत भेटणार आहोत. विश्वजीत कदम, विशाल पाटील हे आमचेच आहेत. आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटतं की हा मतदारसंघ आपल्याकडे राहावा. मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपाशी युती असतानाही असं झालं आहे. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. त्यामुळे विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

दोन महिन्यांनी राणे तिहार तुरुंगात

उद्धव ठाकरे यांना अटक होईल असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे, याबाबत प्रश्न विचारला असता तेव्हा नारायण राणे कुठे असतील? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांनंतर आमची सत्ता येते आहे. त्यावेळी नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यांनी ते तिहार जेलमध्ये असतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election : “हॅशटॅग जसा माझा श्रीकांत तसा हेमंत”; अयोध्या पौळ यांची खोचक टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -