घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : त्यांची विकेट आधीच पडली, ते क्लिन बोल्ड; मुख्यमंत्री...

Lok Sabha 2024 : त्यांची विकेट आधीच पडली, ते क्लिन बोल्ड; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या मतदारसंघातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई : त्यांची (उद्धव ठाकरे) विकेट अगोदरच पडलेली आहे. ते क्लिन बोल्ड झाले आहेत. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून तुम्ही पाहताय की, जे 15 ते 20 वर्षांपूर्वी काम व्हायला पाहिजे होते, पण तेव्हा ती काम झाली नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (Lok Sabha Election 2024 CM Eknath Shinde Slams Uddhav Thackeray In Mumbai)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांच्या मतदारसंघातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“मुंबईतील शिवसेनेच्या तीन उमेदवारांच्या मतदारसंघातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे, रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव त्यांच्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला आले होते. या बैठकीत निवडणुकीची पुढील स्ट्रॅटजी, पुढील भूमिका, निवडणूक प्रचार याबाबतचा आढावा घेतला. अतिशय चांगल्या प्रकारची बांधणी झालेली आहे. कार्यकर्त्यांनी कामालाही अगोदरच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे या महायुतीच्या तिन्ही जागा आम्ही जिंकू. त्याचबरोबर भाजपच्या तीन जागा मुंबईत असून महायुतीच्या एकूण सहा जागा आम्ही जिंकणार आहे. असाप्रकारचे वातावरण सर्वत्र असून, कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. तसेच, ते या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला विजयी करुनच थांबणार आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“लोकसभेच्या ठाणे, कल्याण, नाशिक मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. शिवसेनेचे सगळे 15 उमेदवार जाहीर झालेले आहेत. मुंबईमध्ये आम्ही षटकार मारणार आणि महायुती जिंकणार. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याची आम्हाला आशा आहे. मुंबईत आमच्या दोन सभा होणार आहेत”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

तुम्ही षटकार मारणार म्हणतात तर विकेट कोणाची काढणार, उद्धव ठाकरेंची का? असा प्रश्न विचारला असता त्यांची विकेट अगोदरच पडलेली आहे, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. “ते क्लिन बोल्ड झालेले आहेत. मी जेव्हापासून मुख्यमंत्री झालो तेव्हापासून तुम्ही पाहताय की, जे 15 ते 20 वर्षांपूर्वी काम व्हायला पाहिजे होते, पण तेव्हा ती काम झाली नाहीत. आता पायाभूत सुविधांसह रस्त्यांचे काँक्रिटीकरण होत आहे. मुंबईत सुशोभिकरण केले जात आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू आहे. कोस्टल रोड सुरू झाला आहे”, अशी टीकाही यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केली.


हेही वाचा – मनसेसारखा आमचा बिनशर्त पाठिंबा नाही, रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -