घरमहाराष्ट्रSanjay Raut : बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसाठी मोदी मत मागतायत; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : बलात्कार करणाऱ्या व्यक्तीसाठी मोदी मत मागतायत; संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकातील हसन येथील जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवन्ना यांनी त्यांच्या मोबाइल फोनमधून शेकडो सेक्स व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोदींवर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 Narendra Modi seeks vote for rapist Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा ढोंग करणार पक्ष आहे. कर्नाटकात एका व्यक्तीचे 2800 व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तो व्यक्ती भाजपा परिवारातील सदस्य आहे. मोदींचा हा एवढा मोठा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयातील सदस्याने 2800 बलात्कार केले आणि मोदी त्यांच्यासाठी मते मागतात. असे घृणास्पद कृत्य जर कोणी करू शकत असेल तर ते केवळ एक अतृप्त भटकणारा आत्माच करू शकतो आणि मोदी ते काम करत आहेत. मोदी जाऊन बलात्कार करणाऱ्या आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागत आहेत. याबद्दल मोदींच्या मनात कोणतीही खंत नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

काय प्रकरण आहे?

दरम्यान, अलीकडेच प्रज्वल रेवन्ना यांचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर त्याच्या घरात काम करणाऱ्या नोकराने प्रज्वल रेवन्ना यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणप्रकरणी एफआयआर दाखल केली. नोकराने प्रज्वल रेवन्नाची पत्नी भवानी हिचा नातेवाईक असल्याचा दावा केला आहे. त्याने होलेनरसीपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, प्रज्वल रेवन्ना घरात काम करणाऱ्या महिलांना आपल्या खोलीत बोलावत असे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे.

- Advertisement -

नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही (We have no opposition to Naseem Khan’s candidature)

दरम्यान, आज सकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा कधीही विरोध नव्हता. जात आणि धर्म पाहून शिवसेना कधीही उमेदवारी देत नाही किंवा विरोध करत नाही. उमेदवारी ठरवताना मित्र पक्षांशी चर्चा केली. एकत्र काम करायचे असल्याने अशी चर्चा करण्यात येते. नसीम खान हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तोलामोलाचे उमेदवार आहेत. मात्र, कोणाला उमेदवारी द्यायची, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी नसीम खान यांना उमेदवारी दिली असती, तर शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहिली असती. आताही काँग्रेसला वाटत असेल तर ते उमेदवार बदलू शकतात. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेसचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. आमच्या मित्रपक्षांचा जो कोणी उमेदवार असेल, तो महाविकास आघाडीचा असेल, त्याला विजयी करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, असेही संजय राऊत स्पष्ट केले.

हेही वाचा – Sanjay Raut : नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; राऊतांचे मोदींना जोरदार प्रत्युत्तर

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -