घरमहाराष्ट्रSanjay Raut : स्वत: शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा...; संजय...

Sanjay Raut : स्वत: शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा…; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

Subscribe

स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, फडणवीसांचं सध्या हेच धोरणं दिसतं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मुंबई : उद्धव ठाकरेंनी त्याचं मुख्यमंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी भाजपाचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis)

संजय राऊत म्हणाले की, तुम्ही आमचे 40 आमदार का फोडले सांगा ना? त्यावर तुम्ही बोलत नाहीत. शरद पवार आणि आमचे 40 आमदार फोडले, म्हणजे स्वत: शेण खायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा, फडणवीसांचं सध्या हेच धोरण दिसतं आहे. स्वत: खा खा शेण खायचं, शेणात तोंड बुडवायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घ्यायचा, हे त्याचं धोरणं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

विजय करंजकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या जाण्याने आम्हाला मोठा फटका बसला नाही. राजाभाऊ वाजे हे 2 लाखांच्या फरकाने निवडून येत आहेत. काही लोक गेले असतील, जात असतात, पण 4 जूननंतर त्यांना पश्चाताप होईल. विजय करंजकर यांच्यासोबत शेवटपर्यंत चर्चा केली होती. कारण ते आमचे जुने जाणने अनुभवी कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही त्याचं नाव त्यांना न विचारता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत पाठवलं होतं. तेव्हा त्यांनी आम्हाला का नाही विचारलं, माझ नाव का पाठवलं? पक्षात इतर ज्येष्ठ नेते आहेत. पण होत असतं असं असे म्हणत संजय राऊत यांनी जास्त बोलणं टाळलं.

हेही वाचा – Sanjay Raut : स्वत: शेण खायचं अन् दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा…; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

- Advertisement -

एकनाथ शिदेंनी काय दावा केला होता? (Eknath Shide claim)

दरम्यान, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, पंतप्रधान मोदींनी ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम व्यक्त करून त्यांच्यासाठी महायुतीचे दार उघडले आहे, असे वाटते का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनाच आता भाजपासोबत युती व्हावी असे वाटते आहे. कारण त्यांनी तसे प्रयत्न देखील चालवले आहेत. पण दगाबाजी करणार्‍या ठाकरेंशी युती नको असे भाजपाने ठरवून टाकले आहे. त्यामुळे उबाटा गट महायुतीत येण्याचा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरेंनी आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शाबूत राखण्यासाठी भाजपाचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना त्यात यश आले नाही. नंतर उद्धव ठाकरेंना सोडून आमदार माझ्यासोबत आले आणि आमची नैसर्गिक युती असलेल्या भाजपासोबत आम्ही सरकार स्थापन केले. भाजपाने शिवसेना फोडली नाही, तर शिवसेनाच उद्धव ठाकरेंना सोडून आमच्यासोबत आली. यातला फरक महत्त्वाचा आहे, असे रोखठोक मत एकनाथ शिंदे यांनी मांडले होते.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणुकीनंतर दोन पक्ष मर्ज होतील किंवा अस्तित्वात नसतील; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -