घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रSanjay Raut : निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut : निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय; संजय राऊतांची टीका

Subscribe

देशाचा निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सांगली : देशभरात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत असून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना अनेक मार्गांनी आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या दोन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी जाहीर केली आहे. ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून अधिक आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut Election Commission of the country is suffocated in the grip of Modi-Shah)

संजय राऊत म्हणाले की, अत्यंत महत्त्वाचा गंभीर विषय या निवडणुकीतला काल समोर आला आहे. भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा? या देशाचा निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलेला आहे. ईव्हीएम, आचारसंहितेची प्रकरणे असतील, कारवाई असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय असतील. त्यात आता अजून एक भर पडली आहे, ती म्हणजे साधारण 6 ते 7 टक्के मतं अचानक वाढल्याचं दाखवलं आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या 3 दिवसांनी त्यांनी जे आकडे दिले आहेत. त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 7 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही; संजय राऊतांचा टोला

संजय राऊत म्हणाले की, नांदेडमध्ये मतदान संपलं, तेव्हा 52 टक्के मतदान झालं होतं, हे निवडणूक आयोगाचेच आकडे आहेत. त्यात अर्धा किंवा एक टक्का फरक असू शकतो. मात्र आता 52 टक्क्याचं 62 टक्के हे कसं होऊ शकतं? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी असाही आरोप केला की, देशभरात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने मतदानाच्या टक्क्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वाढलेलं मतदान कोणी केलं? मतदानाची टक्केवारी जाहीर करायला 11 दिवस का लागले? सध्या डिजीटल इंडिया आहे, त्यामुळे हे सर्व खूपच धक्कादायक आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी हा जावईशोध कुठून लावला? शरद पवारांची टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -