घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रMaharashtra Politics : फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत; संजय...

Maharashtra Politics : फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत; संजय राऊतांचा टोला

Subscribe

फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सांगली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफरही दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता फडणवीस लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Sanjay Rauts Criticism on Fadnavis Uddhav Thackeray)

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस काही गौप्यस्फोट करत नाहीत. फडणवीस यांच्याकडे काही गोपनीय अशी माहिती नाही. स्फोट करावा अशी कोणती गोष्ट नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. फडणवीस आता लवंगी फटाका इतकाही स्फोट करू शकत नाहीत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खोटे आरोप करण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत. एकवेळ गृहीत धरा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलले असतील तर त्यात गौप्यस्फोट काय? तुम्ही (देवेंद्र फडणवीस) मुख्यमंत्री व्हा हा गोप्यस्फोट आहे. मोदी आणि अमित शहांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं नाही, तिथे आम्ही कोण देणार. नरेंद्र मोदी आणि अमित शहा तुमच्या पक्षाचे असून तुम्हाला मुख्ममंत्रीपद दिलं नाही, तुम्हाला मुख्यमंत्रीपदालायक समजलं नाही, तिथे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देणार, असा पुनरुच्चार संजजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी हा जावईशोध कुठून लावला? शरद पवारांची टीका

मुख्यमंत्रीपदासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोन झाला होता का? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून भरकटल्यासारखे बोलत आहेत. त्याचं कारण असं आहे की, महाराष्ट्राची जमीन त्यांच्या पायाखालून सरकत आहेत. ते लोकसभा हरत आहेत, ते राजकारण हरत आहेत, उद्या तर विधानसभा हरणार आहे. ज्या प्रकारचं राजकारण फडणवीसांना महाराष्ट्रात सुरु केलं, तिच तलवार त्यांच्यावर उलटते आहे आणि त्या भयातून ते लवंग्या फटाक्या फोडत आहेत. महाराष्ट्रातील लोकं त्यांना फार गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

- Advertisement -

निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलाय (Election Commission suffocated Modi-Shah grip)

दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी बुधवारी (1 मे) जाहीर केली. यासंदर्भात संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा? या देशाचा निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या पकडीमध्ये गुदमरलेला आहे. ईव्हीएम, आचारसंहितेची प्रकरणे असतील, कारवाई असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय असतील. त्यात आता अजून एक भर पडली आहे, ती म्हणजे साधारण 6 ते 7 टक्के मतं अचानक वाढल्याचं दाखवलं आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या 3 दिवसांनी त्यांनी जे आकडे दिले आहेत. त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 7 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – Election Commission : मतदानाच्या टक्केवारीवरून नवा वाद; निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न 

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -