घरमहाराष्ट्रSanjay Raut : चंदा दो धंदा लो खेळाचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे,...

Sanjay Raut : चंदा दो धंदा लो खेळाचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे, राऊतांची पंतप्रधानांकडे तक्रार

Subscribe

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात आणि ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावर झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशातील जनतेवर होतो. भ्रष्टाचार संपवणे हे आपले प्राधान्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच म्हटले आहे. याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे भ्रष्टाचाराची तक्रार दिली आहे. ‘चंदा दो धंदा लो’ खेळाचे सूत्रधार मिंधे सरकारचे बाळराजे (खासदार डॉ. श्रीकांत शिंदे) असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Lok Sabha Elections 2024: Sanjay Raut’s Letter to Prime Minister on Shrikant Shinde Foundation Corruption)

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनसंदर्भात दिलेले पत्र ट्वीट केले आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात आणि ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे, असे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – BJP vs Thackeray group : नारदमुनींची कथा सांगत ठाकरे गट म्हणतो, शेवटी संस्कार महत्त्वाचे…

महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याच धंदा

देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या 10 वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. 2024च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली ‘पांढरा’ करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे, अशी सुरुवात संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

धर्मादाय आयुक्तांकडून माहिती मिळेना

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत, असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देणगीदार कोणाचे लाभार्थी?

श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना रोख स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपा नेत्याची जीभ घसरली, काँग्रेसच्या महिला मंत्र्याला दिला अजब सल्ला


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -