घरदेश-विदेशLok Sabha 2024 : भाजपा नेत्याची जीभ घसरली, काँग्रेसच्या महिला मंत्र्याला दिला...

Lok Sabha 2024 : भाजपा नेत्याची जीभ घसरली, काँग्रेसच्या महिला मंत्र्याला दिला अजब सल्ला

Subscribe

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत टिप्पणी करून संजय पाटील यांनी संपूर्ण महिलावर्गाला लक्ष्य करून त्यांचा अपमान केला आहे. भाजपाची महिलाविरोधी वृत्ती वाढत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

बंगळुरू : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता जेमतेम चार दिवस उरले आहेत. त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पण काही ठिकाणी टीकेचा स्तर घसरताना दिसत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या महिला मंत्र्यांना अजब सल्ला देताना भाजपा नेते संजय पाटील याची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

बेळगाव येथील सभेत भाजप नेते संजय पाटील यांनी काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर कडाडून टीका केली. कर्नाटकातील आठ वेगवेगळ्या भागांत मी प्रभारी म्हणून काम केले आहे. बेळगावमध्ये मोठ्या संख्येने महिला भाजपाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणीने (लक्ष्मी हेब्बाळकर) झोपेची गोळी घ्यावी किंवा चांगली झोप येण्यासाठी मद्याचा अतिरिक्त पेग घ्यावा असे मला वाटते, असा सल्ला त्यांनी दिला. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल त्यांनी अशी टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : दिल्लीतील तीनही जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर, अशी असेल लढत

संजय पाटली यांच्या या वक्तव्याबाबत कर्नाटक काँग्रेसने ट्विटरवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत टिप्पणी करून संजय पाटील यांनी संपूर्ण महिलावर्गाला लक्ष्य करून त्यांचा अपमान केला आहे. भाजपाची महिलाविरोधी वृत्ती वाढत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisement -

जो कोणी महिलांना या नजरेने बघतो, त्याचा अर्थ आता त्याचे पतन सुरू झाले आहे. भाजपा आणि जनता दल सेक्युलर (JDS) यांचे पतन सुरू झाले असल्याने त्यांची महिलांविरोधी भूमिका वाढत आहे. परिणामी, कौरव आणि रावणाप्रमाणे भाजपा आणि जेडीएसचा देखील निश्चितच विनाश होईल, असे काँग्रेसने म्हटले आहे.

लक्ष्मी हेब्बाळकर यांचा मुलगा मृणाल रवींद्र हेब्बाळकर हे बेळगावी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. कर्नाटकातील 28 लोकसभा जागांसाठी 26 एप्रिल आणि 7 मे अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.

हेही वाचा – BJP vs Thackeray group : नारदमुनींची कथा सांगत ठाकरे गट म्हणतो, शेवटी संस्कार महत्त्वाचे…


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -