घरक्रीडाMI vs CSK : विराटची विनंती पण हार्दिक पांड्या...; चाहत्यांकडून होतोय सातत्याने...

MI vs CSK : विराटची विनंती पण हार्दिक पांड्या…; चाहत्यांकडून होतोय सातत्याने ट्रोल

Subscribe

मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबई इंडियन्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या संघ मालकांनी ज्या दिवशी मुंबईच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली त्याच दिवशी अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचे पेज अनफॉलो केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या जगात मुंबईच्या संघासाठी मोठं नुकसान आहे.

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून रोहित शर्माला हटवल्यापासून मुंबई इंडियन्सला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या संघ मालकांनी ज्या दिवशी मुंबईच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड केली त्याच दिवशी अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचे पेज अनफॉलो केले. त्यामुळे सध्या सोशल मीडियाच्या जगात मुंबईच्या संघासाठी मोठं नुकसान आहे. विशेष म्हणजे हार्गित पांड्या हा अष्टपैलू असला तरी, त्याला आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात हार्दिकला ट्रोल केले जाते. नुकताच मुंबईचा सामना चेन्नईशी झाला. त्यापूर्वी बंगळुरूसोबत झाला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. (MI vs CSK hardik pandya again trolled with rohit chants in csk vs mi match IPL 2024)

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. या पराभवासह मुंबईला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या हे दोघे जण नाणेफेकीसाठी मैदानात आले होते. त्यावेळी चाहत्यांनी रोहित रोहित नावाची घोषणाबाजी केली. मैदानात चाहत्यांचा इतका जल्लोष होता, की समालोचक आणि दोन्ही कर्णधारालाही काही ऐकू येत नव्हते.

- Advertisement -

हेही वाचा – Rohit Sharma News : हिटमॅन रोहित शर्मा लवकरच होणार निवृत्त? त्या विधानामुळे चर्चांना उधाण

दरम्यान, रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. चेन्नईच्या सामन्यात चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला पुन्हा ट्रोल करण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. पण याही सामन्यात चाहत्यांनी आणि स्टेडियममधील उपस्थितांनी हार्दिकला प्रचंड ट्रोल केले.

- Advertisement -

मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यावेळी विराट कोहली याने चाहत्यांना हार्दिक पांड्याची हूटिंग करु नका, अशी विनंती केली होती. विराट कोहलीने चाहत्यांसमोर हातही जोडले होते. त्यावेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याचं हूटिंग झालं नाही. पण चेन्नई विरुद्धच्या सामन्यात चाहत्यांकडून हार्दिक पांड्याचे पुन्हा हूटिंग करण्यात आले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, चेन्नई विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी त्याला जोरदार ट्रोल करण्यात आले. त्यावेळी रोहित रोहित अशी घोषणाबाजी करत हार्दिकला चाहत्यांकडून डिवचण्यात आले.

दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2024) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची कर्णधारपदावरुन हाकालपट्टी केली. मुंबईने गुजरातकडून आयात करण्यात आलेल्या हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकली. पण ही गोष्ट चाहत्यांना पटली नसून प्रत्येक सामन्यावेळी चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले.


हेही वाचा – IPL 2024 : …तर रोहित शर्मासाठी मी माझा जीवही धोक्यात घालेन; प्रीती झिंटा असं का म्हणाली?

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -