घरमहाराष्ट्रमुसळधार पावसामुळे 'या' ट्रेन रद्द

मुसळधार पावसामुळे ‘या’ ट्रेन रद्द

Subscribe

मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. याचा परिणाम रेल्वेसेवेवर झाला आहे. अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेकांचे मार्ग बदलण्यात आले आहे.

मुंबई आणि उपनगरात सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. विशेषत: मुंबईची लाईफलाईन या पावसामुळे कोलमडली. तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील रद्द झाल्या. आता मध्यरेल्वेवर आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या अनेक लांबपल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून  अनेक गाड्या वळवण्यात देखील आल्या आहेत. आज (१० जुलै) लांब पल्ल्याच्या गाड्यांनी तुम्ही प्रवास करणार असाल तर रेल्वेचे हे वेळापत्रक एकदा नक्कीच बघा.

रद्द केलेल्या गाड्या (मध्य रेल्वे)

२२१०६ पुणे – मुंबई इंद्गायणी एक्सप्रेस

- Advertisement -

११००८ पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस

११००७ मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस (११ जुलै)

- Advertisement -

२२१०५ मुंबई- पुणे इंद्रायणी एक्सप्रेस (११ जुलै)

५१३१७/ ५१३१८ पुणे-कर्जत- पुणे पॅसेंजर १० आणि ११ जुलै)

वळवलेल्या गाड्या

११०२६ पुणे भुसावळ एक्सप्रेस ही गाडी दौंड-मनमाड मार्गे वळवण्यात आली आहे

११०२५/ ११०२६ भुसावळ- पुणे – भुसावळ एक्सप्रेस मनमाड- दौंड मार्गे वळवण्यात आली आहे (११ जुलै)

पश्चिम रेल्वेच्या सेवेवरही परिणाम

पश्चिम रेल्वेवरही पाणीच पाणी झाले आहे. वसई, नालासोपारा आणि विरार या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे या ठिकाणी रेल्वेसेवा ठप्प आहे. याचा परिणाम पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही झाला आहे.

१२२६३ पुणे- हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (१० जुलै) दौंड- मनमाड- खांडवा- भोपाळ मार्गे वळवण्यात आली आहे

१९५६७ तुतीकोरिन- ओखा विवेक एक्सप्रेस (८ जुलैला निघाली. सध्या कमान रोडला आहे) इगतपुरी मनमाड मार्गे वळविण्यात आली आहे

१४८०५ यशवंतपूर- बारमेर एसी एक्सप्रेस (लोणावळाहून ८ जुलै रोजी निघाली) इगतपुरी- भुसावळ-खांडवा-भोपाळ- रतलाम- बेराज मार्गे वळवण्यात आली आहे

या शिवाय पश्चिम रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -