घरलाईफस्टाईलआरोग्यदायी सात्विक 'दही'

आरोग्यदायी सात्विक ‘दही’

Subscribe

आपल्या आरोग्याकरता दही अतिशय महत्त्वाचं काम करतं. त्यामुळे दररोजच्या आहारात दह्याचा वापर असणं फायदेशीर ठरतं.

ताजे आणि घरामध्ये बनवलेले सात्विक दही बहुतेक व्यक्तींना आवडते. त्यामुळे नियमित एक वाटी दह्याचे सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहाते. त्याचबरोबर दह्यामुळे छोटे – मोठे त्रास देखील दूर होण्यास मदत होते.

  • दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बी जीवनसत्व असते. त्यामुळे पचनशक्ती वाढवण्याकरता दही उपयुक्त ठरते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरता दररोज दह्याचे सेवन करावे.health benefits of curd
  • जेवणाची वेळ चुकल्यास अॅसिडिटीचा त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी दही खावे. दही खाल्ल्याने अॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळते.
  • वजन कमी करायचे असल्यास दही खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास दही हे योग्य डाएट आहे. दह्यात असलेले कॅल्शिअम तुमच्या शरीरातील चरबी घटवण्यास मदत करते.
  • हाडांना मजबुती हवी असल्यास दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी जीवनसत्त्व असल्याने हाडांना मजबुती मिळते.health benefits of curd
  • रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये असलेले पोटॅशिअम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दही फायदेशीर आहे. आजारामध्ये कमी होणाऱ्या पांढऱ्या पेशी वाढवण्याचं काम दही करतं.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -