घरठाणेजिल्ह्यात लम्पी आजाराने ७८ जनावरे दगावली

जिल्ह्यात लम्पी आजाराने ७८ जनावरे दगावली

Subscribe

५६ मृत जनावरांच्या पशु पालकांना मदत मिळाली

ठाणे : ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ७८ जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला असून त्यापैकी ५६ जनावरांच्या पशु पालकांना शासनाकडून मदतीचा हात मिळाला असून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी पाठोपाठ ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील पशु वैद्यकीय विभागाने कंबर कसत, या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
सध्याच्या घडीला जिल्ह्यात या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या थेट ८५९ वर पोहोचली आहे. तर, या आजाराने मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. या आजारावर ५३५ जनावरांनी मात केल्याने ते आजारातून मुक्त झाले आहे. तर, सध्याच्या घडीला २४६ जणावारंवर उपचार सुरु असून ९ जनावरे गंभीर अवस्थेत असल्यची माहिती पशु संवर्धन विभागाकडून देण्यात आली.
लम्पी त्वचारोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविल्यामुळे लम्पी त्वचा रोगनियंत्रणात आला आहे. या रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. तसेच मृत पावलेल्या जनावरांमध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई देण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ७८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या जनावरांच्या पशु पालकांना मदत देण्यासाठीचे प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावावर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीत ७८ पशु पालकांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत ५६ जनावरांच्या पशु पालकांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात आली असून उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच हि रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -