घररायगडमहाड तालुक्यातील २२ ग्रामपंचायती बिनविरोध;५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ

महाड तालुक्यातील २२ ग्रामपंचायती बिनविरोध;५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ

Subscribe

तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७३ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्या असून ५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ झाल्या आहेत. तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २१७ तर सदस्य पदासाठी ९६१ अर्ज दाखल झाले होते काळ मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ५१ ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत.

 

महाड: तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७३ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध जाहीर झाल्या असून ५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ झाल्या आहेत. तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २१७ तर सदस्य पदासाठी ९६१ अर्ज दाखल झाले होते काळ मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ५१ ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत. महाड तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची खुटील, कोंझर, पूनाडे तर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, नागाव, पिंपळवाडी, रूपवली, मोहोत, निगडे, दापोली, राजीवली, कुर्ले, चिंभावे मोहल्ला, पाचाड, रावतळी, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभारखिंड, कुंबळे, या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र कुंबळे आणि फाळकेवाडी या दोन ग्रामपंचायती मध्ये सरपंच पदा साठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाही.

- Advertisement -

सरपंच पदासाठी १२० जण तर सदस्य पदासाठी ७३५ उमेदवार
महाड तालुक्यात सरपंच पदासाठी ७३ ग्रामपंचायत मधून २१७ जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर सदस्य पदांसाठी ९६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २१७ पैकी ९७ लोकांनी माघार घेतली तर सदस्य पदासाठी ९६१ जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी २२६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले सद्यस्थितीमध्ये सरपंच पदासाठी १२० जण तर सदस्य पदासाठी ७३५ जण नशीब आजमावत आहेत.
=============

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -