घरमहाराष्ट्रग्रीड फेल झाला नाही

ग्रीड फेल झाला नाही

Subscribe

विजेची मागणी घटल्याने महाराष्ट्राचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन करत ९ मिनिटे बत्ती बंद ठेवण्याची विनंती केली होती. या आवाहनाला भारतात मोठा प्रतिसाद मिळाला. या ९ मिनिटांच्या कालावधीत देशातली विजेची मागणी ३१ हजार ८९ मेगावॅटने कमी झाली, असा अहवाल देशपातळीवर काम करणार्‍या नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरच्या पॉवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केला आहे. महाराष्ट्रात अपेक्षित अंदाजापेक्षा विजेची मागणी दुपटीने कमी झाल्याने राज्याच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदनही केले आहे.

पंतप्रधानांनी ५ एप्रिल रोजी केलेल्या आवाहनानुसार भारतातील विजेची मागणी कमी व्हायला रात्री ८.४५ वाजल्यापासूनच सुरुवात झाली होती. भारतातील किमान विजेची मागणी ९ वाजून १० मिनिटांनी ८५ हजार ७९९ मेगावॅट अशी नोंदवण्यात आली. तर विजेची मागणी १० वाजून १० मिनिटांनंतर वाढण्याची सुरुवात होत ही मागणी १ लाख १४ हजार ४०० मेगावॅट इतकी झाली. विजेच्या ग्रीडची कमाल फ्रिक्वेन्सी या काळात ५०.२६ हर्टझ ते ४९.७० मेगाहर्टझ इतकी होती. तर किमान विजेची मागणी २१.०८ हर्टझ ते २०.४९ हर्टझ इतकी होती.

- Advertisement -

विजेची मागणी ८.४५ वाजता कमी होताच राज्यातील विजेच्या मागणीत जलविद्युत प्रकल्पांचा वाटा वाढला. १७ हजार ५४३ मेगावॅट इतकी जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू झाली. दरम्यानच्या काळात ही विजेची मागणी २५ हजार ५५९ मेगावॅट ते ८०१६ मेगावॅट यादरम्यान होती. ९.१० वाजता जलविद्युत प्रकल्पांची विजेची मागणी वाढत ही मागणी ८०१६ मेगावॅटवरून १९ हजार १२ मेगावॅट इतकी झाली. विजेची कमी झालेली मागणीचे औष्णिक वीज प्रकल्प आणि गॅस वीज प्रकल्पातून व्यवस्थापन करण्यात आले.

कोणत्याही अडथळ्याशिवाय विजेचे व्यवस्थापन करणे या कालावधीत शक्य झाले. महाराष्ट्रातही दुप्पट अशी विजेची मागणी कमी झालेली असतानाही विजेचे व्यवस्थापन करण्यात महाराष्ट्राच्या स्टेट लोड डिस्पॅच सेंटरला यश आले. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे कौतुक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात विजेची मागणी १७०० मेगावॅट कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र ही विजेची मागणी २९०० मेगावॅटने कमी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -