घरBudget 2024Maharashtra Budget Session : चहल, सुधाकर शिंदेंचा मुद्दा गाजला, वडेट्टीवारांकडून सरकारची पोलखोल

Maharashtra Budget Session : चहल, सुधाकर शिंदेंचा मुद्दा गाजला, वडेट्टीवारांकडून सरकारची पोलखोल

Subscribe

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकारच्या आशीर्वादामुळे महानगरपालिकेत अनेक वादग्रस्त अधिकारी ठाण मांडून आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी निवडणूक आयोगाने दोनदा पत्र दिले. तरी देखील सरकार बदली करत नाही. आयुक्त चहल यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. तरीही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल बदली का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करत आज (ता. 01 मार्च) विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारची पोलखोल केली आहे. (Maharashtra Budget Session: Vijay Wadettiwar made a dig government on issue of Iqbal Singh Chahal)

हेही वाचा… Maharashtra Politics : “मी त्यांच्या घरचं खात नाही…” भुसेंसोबतच्या वादावर महेंद्र थोरवे थेटच म्हणाले

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असल्याने याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, आयआरएस केडरमधील अधिकारी सुधाकर शिंदे यांची का बदली होत नाही? त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बसून असणारा जोशीबुवा कोण आहे? कोणाच्या मर्जीमुळे सुधाकर शिंदे वर्षानुवर्षे ठाण मांडून आहे? सरकारने अशा अपात्र अधिकाऱ्यांना महत्वाची पदे दिल्याने आयएएस अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे. वेलारासू नावाचा अधिकारी पायाभूत सेवा समितीवर चौकशी सुरू कार्यरत असणे ही बाब गंभीर आहे.

तर, यावेळी त्यांनी मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याबाबतही प्रश्न उपस्थित केले. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल बदली का होत नाही? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना उपस्थित केला. मुंबई मनपा आयुक्तांच्या विरोधात ईडी चौकशी असल्याने त्यांची बदली केली पाहिजे, असे दोन पत्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे. पण तरी देखील मुख्यमंत्र्यांकडून त्यांना पाठिशी घालण्यात येत आहे. त्यांची बदली करण्यात येत नाही. निवडणूक आयोगाचे सचिव यामुळे चिंतेत आहेत. त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे की, त्यांची बदली करा, पण तसे काहीही करण्यात येत नाही, थेट आरोपच आज विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

सिडको येथे दिलीप ढोले यांची बदली केली. हे अधिकारी आयएएस नाहीत. त्यांची चौकशी सुरू असतानाही त्यांना सिडकोत मोठ्या पदावर नेमले आहे. हे पद आयएएस दर्जाचे आहेत. परंतु आयएएस नसलेल्या अधिकाऱ्याला या पदावर बसवले आहे. हे हास्यास्पद आहे. हे अधिकारी अनेकांच्या तिजोऱ्या भरत आहेत. सुधाकर शिंदे महापालिकेत मालक झाले आहेत. सुधाकर शिंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून पदावर बसून आहे. संजय जैस्वाल, अजय वैद्य, स्वाती पांडे, श्रद्धा जोशी अशी अनेक अधिकारी आहेत. सरकारने या अधिकाऱ्यांची मनमानी थांबवावी, अशी सरकारची कानउघडणी वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -