घरमहाराष्ट्रRahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर आता राहुल गांधीही काळारामाच्या दर्शनाला

Rahul Gandhi : मोदी, ठाकरेंनंतर आता राहुल गांधीही काळारामाच्या दर्शनाला

Subscribe

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिराला भेट दिली होती. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधीही काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहचणार आहे. विशेष म्हणजे आता अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर नाशिकमधील काळाराम मंदिराचेही महत्त्वही वाढले आहे. (After Narendra Modi Uddhav Thackeray now Rahul Gandhi too will take darshan at Kalaram temple)

हेही वाचा – LPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र या प्रचारादरम्यान, नाशिकमधील काळाराम मंदिराचे महत्त्व वाढल्याचे पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी नाशिकचा दौरा करत काळाराम मंदिराला भेट दिली होती. यानंतर आथा काँग्रेस नेते राहुल गांधीही येत्या 12 मार्च रोजी काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी यांची 11 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 मार्चला राहुल गांधी नाशिक शहरात येतील. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. यानंतर ते श्री काळारामांच्या दर्शनाला जाणार असल्याची  माहिती मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : “अबकी बार…”, महाराष्ट्रात ‘महायुती 48 विरुद्ध शून्य’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राहुल गांधी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र राहुल गांधींच्या दौऱ्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट घेणार आहेत. 8 मार्च रोजी मनसे पक्षाचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे काळारामाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.

भारत जोडो न्याय यात्रेचा ठाण्यात होणार समारोप

महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्रा एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार असून 479 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. मालेगाव येथून ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून नाशिकमार्गे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात समारोप करणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत 15 राज्यांमधून जाणार आहे. ज्यात एकूण 6 हजार 713 किलोमीटरहून अधिकचा प्रवास बसने आणि पायी केला जाणार आहे. यामध्ये 110 जिल्हे, सुमारे 100 लोकसभेच्या जागा आणि 337 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे 66 दिवस लागणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -