घरमहाराष्ट्रशेवटी मंत्रिमंडळ विस्तार झाला होsss! १३ मंत्र्यांनी घेतली शपथ!

शेवटी मंत्रिमंडळ विस्तार झाला होsss! १३ मंत्र्यांनी घेतली शपथ!

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री मंडळाचा विस्तार केला असून आज डझनभर नव्या मंत्र्यांचा समावेश झाला आहे.

अखेर नाय होय, नाय होय करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री मंडळाचा विस्तार केला असून नव्या डझनभर मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. नव्या चेहऱ्यांमध्ये भाजपाकडून आशिष शेलार, डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय कुटे, अशोक उइके, बाळा भेगडे, अतुल सावे, सुरेख खाडे, परिणय फुके, योगेश सागर, कॉंग्रेसकडून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली आहे. तर जयदत्त क्षीसागर आणि तानाजी सावंत यांचादेखील समावेश झाला आहे. तर रिपाइंकडून अविनाश महातेकर यांनी शपथ घेतली. राज भवनात हा शपथविधी झाला असून, शपथविधीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार देखील उपस्थित होते. राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली.

मंत्रिमंडळ विस्तारात ८ जणांची कॅबिनेट पदी वर्णी

  • राधाकृष्ण विखे पाटील
  • आशिष शेलार
  • डॉ. संजय कुटे
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
  • डॉ. सुरेश खाडे
  • डॉ. अनिल बोंडे
  • डॉ. अशोक उईके
  • तानाजी सावंत (शिवसेना)

यांनी घेतली आज मंत्रिपदाची शपथ

  • राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
  • जयदत्त क्षीरसागर (शिवसेना – कॅबिनेट)
  • आशिष शेलार (कॅबिनेट)
  • डॉ.संजय कुटे (कॅबिनेट)
  • डॉ. सुरेश खाडे (कॅबिनेट)
  • डॉ. अनिल बोंडे (कॅबिनेट)
  • डॉ. अशोक उईके (कॅबिनेट)
  • तानाजी सावंत ( शिवसेना – कॅबिनेट)
  • योगेश सागर (राज्यमंत्री)
  • अविनाश महातेकर (आरपीआय) (राज्यमंत्री)
  • संजय भेगडे (राज्यमंत्री)
  • डॉ. परिणय उके (राज्यमंत्री)
  • अतुल सावे (राज्यमंत्री)

लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आहेत. शिवसेनेला जे यश मिळाले. त्यामध्ये माझा आणि माझ्या शिवसैनिकांचा सिहांचा वाटा होता. त्याचे फलित म्हणून आणि बक्षीस म्हणून मला आज लोकांची सेवा करण्यासाठी आज माझी कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.  – तानाजी सावंत

- Advertisement -

मला योग्य वेळेला योग्य काम दिले. हे मी पद नाही तर जबाबदारी मानतो. योग्यवेळी योग्य निर्णय घेणे ही भाजपाची खासियत आहे.  – आशिष शेलार

काँग्रेसमध्ये असताना मी कधी मंत्रिपदाची अपेक्षा केली नव्हती. मी नेहमीच विरोधीपक्ष नेता असताना आवाज उठवला. सरकारने चांगले निर्णय घेतले त्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे विरोधक जे जे सवाल करतील त्याचे तेवढ्याच ताकतीने उत्तर देऊ.  – राधाकृष्ण विखे पाटील

भाजपच्या या मंत्र्यांनी घेतली शपथ

  • राधाकृष्ण विखे पाटील
  • आशिष शेलार
  • सुरेश खाडे
  • संजय भेगडे
  • संजय कुटे
  • योगेश सागर
  • अतुल सावे
  • अशोक उईके
  • परिणय फुके
  • अनिल बोंडे

शिवसेनेच्या या मंत्र्यांनी घेतली शपथ

  • जयदत्त क्षिरसागर
  • तानाजी सावंत

आरपीआयच्या या मंत्र्यांनी घेतली शपथ

  • अविनाश महातेकर

या मंत्र्यांना डच्चू

  • प्रकाश मेहता
  • विष्णू सावरा
  • राजकुमार बाडोले
  • राजे अत्राम
  • दिलीप कांबळे
  • प्रविण पोटे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -