घरदेश-विदेशउद्धव ठाकरे खासदारांना घेऊन अयोध्येत दाखल

उद्धव ठाकरे खासदारांना घेऊन अयोध्येत दाखल

Subscribe

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह आयोध्येत दाखल झाले आहेत.

गेल्या वर्षी आयोध्येच्या मुद्यावरून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी शिवसेना पुन्हा एकदा आयोध्येला दाखल झाली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या विजयी खासदारांसह आयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वाखाली हा दौरा आयोजीत करण्यात आला आहे. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. सकाळी उद्धव ठाकरे विमानाने फैजाबादला पोहचले असून तेथून ते गाडीने अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

राम मंदीरावरुन केली होती भाजपवर टीका

उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जागोजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज आणि फलक देखील लावण्यात आले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वीही मागच्या नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्येत गेले होते. त्यावेळी राम मंदीराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. ‘राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, त्यास शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे म्हटले होते. तसेच राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे. आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी युतीचा मुद्दाही लांबणीवर ढकलला होता. मात्र, निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत युती केली आणि लोकसभा निवडणुकांमध्ये युतीला मोठे यशही मिळाले. त्यामध्ये शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळाला आहे.

शपथविधीला उद्धव ठाकरे गैरहजर

अयोध्या दौऱ्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गैरहजर राहणार आहेत. राज्यपाल भवनात आज सकाळी ११ वाजता नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यातील शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपद मिळणार असून शिवसेनेकडून अनिल परब, तानाजी सावंत आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदासाठी वर्णी लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘उद्धव ठाकरे दहावेळा जरी अयोध्येला गेले तरी त्याचा उपयोग नाही’

हेही वाचा –  युतीच्या फॉर्म्युल्यावर न बोलण्याचे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांना आदेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -