घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आज 12500 ने घट, मात्र...

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आज 12500 ने घट, मात्र 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

Subscribe

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र ओमिक्रॉनबाधित रुग्णांच्य संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्येतील घट राज्यासाठी कुठे तरी दिलासाजनक बाब आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 28 हजार 286 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहेत. मात्र कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या जवळपास 12,519 ने घटली आहे. तर राज्यात आज 36 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गेल्या 24 तासात राज्यात 21 हजार 941 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2845 ओमिक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे नागपूरमध्ये आहेत. नागपूरात आज 47 ओमिक्रानबाधित रुग्ण आढळले आहेत. यापाठोपाठ पुण्यात २८, पिंपरी चिंचवड ३ आणि वर्ध्यामध्ये 2 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मुंबई, अमरावती, यवतमाळ, भंडारा, ठाणे मनपा, आणि पुणे ग्रामीण भागात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. त्यापैकी 1454 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 75,35,511 झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 94.09 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली! आज 1,857 नवे रुग्ण तर 11 रुग्णांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -